Food Crisis
Food Crisis Agrowon
ॲग्रोमनी

हे वर्ष खाद्यान्न महागाईचेच !

Team Agrowon

रशिया युक्रेन संघर्षामुळे जगभरातील खाद्यान्नाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. खाद्यान्नासकट इंधनाचे दर गगनाला भिडले असून हे वर्ष संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे भाकीत जगभरातील ख्यातनाम संस्थांनी वर्तवले आहे.

२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक संस्थांनी या युद्धाच्या परिणामांबाबत भाष्य केले आहे. या युद्धाने गहू, मका, खाद्यतेल, बार्ली या कमोडिटीजच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. रशिया हा जगातील प्रमुख खत पुरवठादार असल्याने खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. वाहतूक खर्च आणि करन्सी एक्स्चेंजमधील गुंतागुंतही वाढली आहे.

इंधन आणि खतांच्या दरवाढीसह भारतात किरकोळ महागाईचे प्रमाण मार्च महिन्यात १७ महिन्यांत सर्वाधिक ठरले आहे. इंग्लंडमध्ये गेल्या ३० महिन्यांतील किरकोळ महागाईत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेतील मार्च महिन्यातील किरकोळ महागाईचे प्रमाण ८.५ टक्क्यांवर पोहचले असून ४० महिन्यातील हे सर्वाधिक प्रमाण आहे.

मार्च महिन्यातील महागाईसाठी इंधन, निवारा आणि अन्नाची दरवाढ कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण झुरीच येथील इएफजी इंटरनॅशनलने (EFG International) नोंदवले आहे. अमेरिकेत वीजदरात ११ टक्क्यांची वाढ झाली असून खाद्यान्नाच्या किमती १ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे इंधन आणि खाद्यान्नाची दरवाढ झाली, ज्याचे परिणाम पश्चिम आशिया अन आफ्रिकन देशांना भोगावे लागत असल्याचे जागतिक बँकेचे (World Bank) म्हणणे आहे.

जग कोविड महामारीच्या सावटातून बाहेर पडत असताना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आफ्रिकन देश याला सर्वाधिक बळी पडल्याचे वॉशिंग्टन येथील इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिस्ट्युटने (International Food Policy Research Institute) म्हटले आहे. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. ज्याचा फटका खतांच्या किमती वाढल्याने अन पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना बसत असल्याचेही या संस्थेने म्हटले आहे.

या संघर्षाने मार्च महिन्यात खाद्य दर निर्देशांकात विक्रमी १५९.३ टक्क्यांची भर पडली आहे. फेब्रुवारीत हे प्रमाण १२ टक्क्यांवर होते. तृणधान्य निर्देशांकात १७ टक्क्यांची, खाद्यतेल निदेशांकात २३. २ टक्क्यांची वाढ झाल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) म्हटले आहे.

सगळ्या खाद्यान्नाची किंमत यावर्षी ४.५ टक्के ते ५.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या इकॉनॉमिक रिसर्च सर्व्हीसने म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील गहू आणि बार्लीचा एक तृतीयांश पुरवठा प्रभावित झाल्याचे निरीक्षण अमेरिकेतील रेटिंग एजन्सी 'फीच'ने नोंदवले आहे. २०२२ आणि २०२३ या वर्षातही गव्हाचे दर वाढलेले असतील, असेही 'फिच'चे म्हणणे आहे .

या युद्धामुळे खाद्यान्नाच्या किमती वाढल्या असून घरावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग खाद्यान्नावर करावा लागणार आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या उत्पन्नात ०.५ टक्क्यांची घट होणार असल्याचे जागतिक बँकेचे (World Bank)म्हणणे आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका आत्यंतिक दारिद्र्यात असणाऱ्या जनतेला बसणार आहे. कारण त्यांच्या कमाईतील दोन तृतीयांश खर्च खाद्यान्नावरच होणार आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा खर्च वाढणार असल्याची शक्यता जागतिक बँकेने (World Bank) वर्तवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT