Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : यंदाच्या हंगामात सुमारे १ लाख टन बेदाणा विक्री

Bedana Market Update : यंदाच्या हंगामात सुमारे १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली आहे. अजून अंदाजे २ लाख टन बेदाणा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे.

Abhijeet Dake

Sangli News : यंदाच्या हंगामात सुमारे १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली आहे. अजून अंदाजे २ लाख टन बेदाणा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. उच्च दर्जाच्या बेदाण्याला चांगले दर मिळत आहेत. सध्या १५० ते २०० रुपये असा दर आहे.

राज्यात यंदा बेदाण्याचे ३ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. यंदाच्या हंगामातील नवा बेदाणा फेब्रुवारी महिन्यात बाजारात विक्रीस आला. त्यापासून आतापर्यंत सुमारे १ लाख टन बेदाण्याची विक्री झाली आहे.

मे महिन्यापर्यंत बेदाण्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री रोखली होती. मेपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. शेतकरी द्राक्ष हंगामासाठी पुढील तयारीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने बेदाणा विक्री करीत आहेत.

दर्जेदार बेदाणा २० टक्के

राज्यात यंदा ३ लाख टन बेदाणा तयार झाला आहे. उत्पादनाच्या अवघा २० टक्के म्हणजे ६० ते ७० हजार टन बेदाणा उच्च दर्जाचा आहे. हा बेदाणा विक्रीसाठी कमी-अधिक प्रमाणात बाजारात येत आहे. त्यामुळे या बेदाण्याला चांगले दर मिळत आहेत. शेतकरी दराची स्थिती पाहूनच विक्रीचे नियोजन करत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना सण, उत्सवांची प्रतीक्षा

येत्या काळात श्रावण, गोकुळ अष्टमी आणि गणपती हे सण, उत्सव येत आहेत. त्यानिमित्त जुलैच्या मध्यापासून बेदाणा खरेदीसाठी देशभरातील व्यापाऱ्यांकडून लगबग सुरू होईल. त्यादृष्टीने शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करतील. या सणांनिमित्त देशभरातून बेदाण्याला मागणी असते. त्यामुळे दरात वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बेदाणा दरस्थिती (दर प्रतिकिलो रुपये)

चांगली प्रत ः १५० ते २००

दोन नंबरची प्रत ः ७० ते १३०

यंदा बेदाण्याच्या उत्पादनाच्या २० टक्के दर्जेदार बेदाणा आहे. या बेदाण्याला मागणी असल्याने त्याला चांगले दर आहेत. तर दोन नंबर प्रतीच्या बेदाण्याचे दर गेल्या १५ ते २० दिवसांपासून टिकून आहेत. एकंदर येत्या काही काळात दर टिकून राहतील, अशी स्थिती सध्यातरी दिसत आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT