Chana Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement Scam : परभणीत हमीभाव हरभरा खरेदी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा

Chana MSP : २०२३ च्या खरेदी हंगामात ‘नाफेड’अंतर्गत परभणी येथील केंद्रावर हमीभाव हरभरा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना ऑफलाइन बनावट पावत्या दिल्या.

माणिक रासवे

Parbhani News : २०२३ च्या खरेदी हंगामात ‘नाफेड’अंतर्गत परभणी येथील केंद्रावर हमीभाव हरभरा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना ऑफलाइन बनावट पावत्या दिल्या. तसेच १९ लाख ३५ हजार ९४७ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी संशयित आरोपी तालुका खरेदी-विक्री संघाचे तत्कालीन व्यवस्थापक माणिक दत्तराव नीलवर्ण (रा. पेडगाव, ता. परभणी) यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. ३) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

नाफेडमार्फत सबएजन्सी असलेल्या परभणी तालुका खरेदी-विक्री संघाअंतर्गत केंद्रावर हरभरा खरेदीवर १४ मार्च ते १३ जून २०२३ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक (सहकरी संस्था) कार्यालयाने या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी केली.

नीलवर्ण यांनी ८ शेतकऱ्यांचा ११७ क्विंटल हरभरा खरेदी केलेला लॉट रद्द केल्याची कुठेही नोंद किंवा कारण दिलेले नाही. संघाचे चेअरमन व संचालक मंडल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रद्द केलेल्या लॉटमधील हरभरा संबंधित शेतकऱ्यांना परत केला नाही.

तसेच विक्रीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली नाही. या परिस्थितीत संघाचे चेअरमन यांनी ऑनलाइन लॉट एंट्री स्लिपधारकांना संघाच्या निधीतून रक्कम अदा केल्यामुळे संघास आर्थिक नुकसान झाले.

तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन पावती निघत नाही, असे खोटे सांगून नीलवर्ण यांनी संबंधित शेतकऱ्यांना बनावट ऑफलाइन पावत्या दिल्या. चौकशी पथकास सादर केलेल्या पावत्यांच्या क्रमांकावरून किमान २६ शेतकऱ्यांची फसवणूक झालेली दिसून येते. मूळ तक्रारकर्ते सर्जेराव आहेर व इतर ८ शेतकऱ्यांची एकत्रित १९ लाख ३५ हजार ९४७ रुपये एवढ्या रकमेचा प्राथमिक स्वरूपात गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास येत आहे.

ऑफलाइन पावत्या दिलेल्यांपैकी ३ शेतकऱ्यांना नीलवर्ण यांनी दिलेले वैयक्तिक खात्याचे धनादेश वटलेले नाहीत. चौकशी समितीच्या अहवालनुसार प्रथमदर्शनी परभणी तालुका खरेदी-विक्री संघ या संस्थेत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

याप्रकरणी परभणी येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सहकार अधिकारी अश्विनी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यास माणिक नीलवर्ण यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT