Chana Market
Chana MarketAgrowon

Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सहा हजारांचा दर

Chana Rate : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचा दर स्थिरावला आहे. सध्या सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असून किमान भाव ५३०० व कमाल भाव ६४७० रुपये मिळतो आहे.
Published on

Akola News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचा दर स्थिरावला आहे. सध्या सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असून किमान भाव ५३०० व कमाल भाव ६४७० रुपये मिळतो आहे.

पेरण्यांचा काळ सुरू असल्याने बाजारातील आवक मात्र मंदावलेली आहे. शनिवारी ४२९ पोत्यांची आवक झाली होती. रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक शेतकऱ्यांनी दराच्या अपेक्षेमुळे साठवून ठेवलेले आहे.

Chana Market
Tur Chana Stock : तूर, हरभऱ्यावर साठा मर्यादा लागू

मात्र, दरवाढीची चिन्हे नसल्याने आता हा शेतीमाल विक्रीला काढला जात आहे. अकोल्यातील बाजारात तुरीचा सरासरी दरही काहीसा कमी झालेला दिसून आला. येथे १० हजार ५०० रुपये सरासरी भावाने तूर विक्री झाली.

Chana Market
Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला सरासरी ६१०० रुपयांचा दर

किमान दरात घसरण होऊन ८३०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. कमाल दरही १२ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. सोयाबीनला सरासरी ४३९५ रुपये दर होता. किमान ३९०० पासून विक्रीला प्रारंभ झाला. कमाल दर ४४५० रुपये मिळाला.

बाजारात दोन पोत्यांची आवक झालेली होती. मुगाला कमाल साडे सात हजारांचा दर सुरू आहे. सरासरी ७२०० पर्यंत मूग विकला जात आहे. उडदाला ५२०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. या दोन्ही वाणांची आवक अवघी २० पोत्यांच्या आत होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com