Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : सोयाबीनमधील घसरणीला अटकाव

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २१ ते २७ सप्टेंबर २०२४

ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची आवक सुरू होईल. ऑक्टोबर व नोव्हेंबर हा सोयाबीनचा मुख्य हंगाम. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबर रोजी आवक सुरू झाली होती. सोयाबीनचे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान येथे घेतले जाते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात या तीन राज्यांचा मिळून ९१ टक्के वाटा आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर सोयाबीनची मुख्य बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.

मात्र देशात सोयाबीनची सर्वाधिक आवक महाराष्ट्रातील लातूर येथे होते. सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय भाव अजूनही घसरत आहेत. त्याचा काही परिणाम भारतातील किमतीवर होतो. केंद्र सरकारने सोयाबीनची हमीभाव खरेदी करण्याची घोषणा केल्यामुळे भावातील घसरणीला अटकाव लागण्याची शक्यता आहे.

२७ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मध्ये या महिन्यात कापसासाठी सप्टेंबर, नोव्हेंबर, जानेवारी व मार्च डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. स्पॉट बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. किमतीत वाढता कल आहे. कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ५९,९२० वर आले होते. या सप्ताहात ते १.७ टक्क्यांनी घसरून रु. ५८,९०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स भाव ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ५८,०८० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.५ टक्क्यांनी कमी आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवतात. नवीन कापसाची आवक नोव्हेंबर पासून सुरू होईल.

NCDEX मध्ये या महिन्यात कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,५८९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५७१ वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,६२४ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्युचर्स या हमीभावापेक्षा रु. १०० ने अधिक आहेत.

मका

NCDEX मध्ये या महिन्यात मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. २,५०० वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. २,५११ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स रु. २,५४२ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत; ते किती अधिक आहेत ते बघून हेजिंगचा विचार करावा.

हळद

NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १४,५८२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. १४,६८७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. १४,३६२ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १४,७९८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ७,६०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ८,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,२५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,८४८ वर आली आहे. लातूर बाजार समितीत किंमत रु. ४,६७८ आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल थांबला आहे. नवीन पिकाची आवक ऑक्टोबरमध्ये सुरू होईल.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,९०० वर आली होती. या सप्ताहात ती ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,९२३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४,६३५ होती; या सप्ताहात ती रु. ४,६७० वर आली आहे. कांद्याच्या किमतीत वाढता तर आवकेत उतरता कल आहे. नवीन पिकाची आवक ऑक्टोबरमध्ये सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,१२५ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ३,२५० वर आली आहे. आवकेत उतरता कल आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT