Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market Rate : तुरीला ९ हजारी दर, डाळ १३० रुपये किलो

Aajcha Tur Bajarbhav : खरीप हंगामातील तुरीला ९ हजार रुपयांची झळाळी मिळाली असली, तरी तूरडाळीचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामातील तुरीला ९ हजार रुपयांची झळाळी मिळाली असली, तरी तूरडाळीचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत. तुरीचे खुल्या बाजारातील वाढते दर शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत.

सध्या डाळीचा दर १३० रुपये प्रतिकिलो असून, पुरवठा व मागणी यातील अंतर वाढत असल्याने दर नजीक काळात १७५ ते १८५ पर्यंत जाण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

या वर्षी तुरीच्या उत्पादनाची सरासरी घसरली आहे. त्यामुळे मागणी असली तरी आवक त्या तुलनेत फार कमी असल्याने तुरीचे खुल्या बाजारातील दर वधारले आहेत.

केंद्राने तुरीला ६६०० रुपये हमीदर दिला असला तरी कोणत्याच शासकीय केंद्रांवर तुरीची खरेदी झाली नसल्याने शासनालाही खुल्या बाजारातून तूर खरेदी करावी लागणार आहे. हंगामाच्या प्रारंभीपासूनच तुरीला सहा हजारांहून अधिक भाव मिळाला आहे.

हंगामात तुरीचे पेरणी क्षेत्र वाढले होते. मात्र अतिवृष्टी व नंतर दव गेल्याने तुरीचे नुकसान झाले व त्याचा एकूणच परिणाम उत्पादन सरासरीवर झाला. मागणी अधिक व पुरवठा कमी यामुळे खुल्या बाजारात सहा हजारांहून अधिक दर मिळू लागला.

हळूहळू दरात सुधारणा होत एप्रिलमध्ये ८८०० रुपये दर मिळाला. मे मध्ये हंगाम ओसरत आला असताना तुरीचा दर नऊ हजारांवर गेला. हा दर आणखी वाढेल, असा अंदाज खरेदीदारांनी वर्तविला आहे.

शेतकऱ्यांना समाधान मिळेल, असे तुरीचे दर वधारत असताना डाळीचे दरही चांगलेच वधारू लागले. सध्या बाजारात तूरडाळ १३० रुपये प्रतिकिलो आहे. मार्चमध्ये हा दर ११९ रुपयांवर गेल्यावर सरकारने स्टॉक लिमिट लावली. मात्र दर कमी झाले नाहीत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

या वर्षी तुरीचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज होता. त्याच वेळी सरकारने स्टॉक लिमिट काढल्याने साठेबाजी वाढली. मागणी व पुरवठ्यातील तफावतीचा लाभ साठेबाजांनी उचलला आहे. आता मर्यादा निश्‍चित केली असली तरी त्यास विलंब झाला आहे.
- राजेश पाटील, अध्यक्ष, अडते व खरेदीदार संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT