Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : अकोल्यात तूर सरासरी ८५५० रुपये प्रतिक्विंटल

Tur Rate : या हंगामातील तुरीच्या काढणीला सुरवात झाली आहे. बाजारात नवीन तुरीची आवकही होत आहे.

 गोपाल हागे

Akola News : या हंगामातील तुरीच्या काढणीला सुरवात झाली आहे. बाजारात नवीन तुरीची आवकही होत आहे. येथील बाजारात तूर किमान ६८०० पासून तर कमाल ९३२० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल रुपये दराने विकत आहे. शनिवारी (ता. ६) सरासरी ८५५० रुपयांचा दर मिळाला.

यंदाच्या खरिपात लागवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीची काढणीही केली. हीच नवीन तूर बाजारात विक्रीला नेली जात आहे. तुरीच्या पिकावर मध्यंतरी कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादकतेला मोठा फटका बसला.

तुरीचे पीक मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्के कमी आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळेच मागील वर्षापेक्षा सध्याच्या काळात आवकही बरीच कमी होत आहे. असे असतानाही तुरीचे दर गेल्या काही दिवसांपासून दबावात आहेत. शासनाकडून परदेशातून तुरीची आयात सुरू असल्याने स्थानिक दरांवर परिणाम झालेला आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नवीन तुरीची मळणी पुढील काही दिवसात आणखी वाढणार आहे. त्यामुळे तुरीची आवक वाढेल, असा अंदाज आहे. आवक वाढल्यानंतर तुरीचा दर नेमका काय राहील, हे सध्या सांगणे कठीण असल्याचे व्यापारी म्हणाले.

उत्पादन ५० टक्क्यांच्या आत

यंदाचे तुरीचे पीक सुरवातीला चांगले होते. वाढही झालेली दिसून येत होती. दरम्यान ऑगस्टमध्ये पडलेल्या खंडाचा परिणाम पिकावर झाला. नंतर फुलोरा व शेंगा पकडण्याच्या स्थितीत कीड रोगांमुळे नुकसान झाले. शिवाय काही भागात पीक उभे वाळले. शेंगामध्ये दाणे परिपक्व न झाल्याने एकरी उत्पादन कमी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT