Onion Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : आवक मंदावल्याने किरकोळ बाजारात कांद्याला ८० रुपये दर

Onion Rate : आवक मंदावल्याने किरकोळ बाजारात किलोला कांदा ८० तर, लसणाला ४८० रुपये दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्याही पदरात फार काही पडत नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Amarvati News : आवक मंदावल्याने किरकोळ बाजारात किलोला कांदा ८० तर, लसणाला ४८० रुपये दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्याही पदरात फार काही पडत नसल्याचे चित्र आहे. चढ्या दरांचा अधिकाधिक लाभ दलाल व विक्रेत्यांनाच होत आहे.

सध्या किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये, तर लसूण ४८० रुपये किलोने विकला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत या दोन्हींची आवक मंदावल्याने तुटवडा होत आहे. स्थानिक बाजारात कांद्याची आवक नाशिक जिल्ह्यातून अधिक होते. तर स्थानिक परिसरातील कांदा उन्हाळ्यात येतो. दिवाळीनिमित्त नाशिकमधील कांद्याची खरेदी-विक्री आठवडाभर बंद होती.

त्याचा परिणाम स्थानिक बाजारातील आवकेवर झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा संपला आहे तर खरिपातील कांद्याची काढणी सुरू असताना जोरदार पावसाने तो खराब केला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन घट झाली आहे. सध्या खरिपातील कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र ती कमी असल्याने तुटवडा आहे.

त्यामुळे कांद्याचे दर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. कांद्याचे हे दर आगामी महिनाभर असेच राहणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. खरिपातील कांद्याची आवक वाढल्यानंतर दरात काहीसा दिलासा मिळू शकेल, असे बाजार समितीच्या भाजीबाजार यार्डवरील कांद्या विक्रेत्यांनी म्हटले आहे.

घाऊक बाजारात ३५० रुपयांवरील दर किरकोळ बाजारात थेट ४८० रुपये किलोवर आहेत. लसणाचा हंगाम अखेरच्या टप्प्यावर असल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. लसणाची रब्बी हंगामात लागवड केली जाते.

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात लसणाची लागवड केली जाते. या लसणाची काढणी साधारणतः फेब्रुवारीपासून काढणी सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी तीन महिने लसणाचे दर चढेच राहणार आहेत, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT