Surangi Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Surangi Rate : सुरंगीला प्रतिकिलो ७०० रुपये दर

Surangi Production : जिल्ह्यात सुरंगीच्या हंगामाला प्रारंभ झाला असून फळे, फुले काढणीला गती आली आहे. सुरंगीला प्रतिकिलो कमाल ७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यात सुरंगीच्या हंगामाला प्रारंभ झाला असून फळे, फुले काढणीला गती आली आहे. सुरंगीला प्रतिकिलो कमाल ७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडीसह इतर तालुक्यांतील १५ हून अधिक गावांमध्ये सुरंगीचे उत्पादन घेतले जाते.

जिल्ह्यात सुरंगीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरंगीची फळे, फुले काढणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आरवली, वडखोल सोन्सुरे, टाक, आसोली, रेडी, खानोली, फणसखोल, मोचेमाड (ता. वेंगुर्ला), धाकोरे, कोलगाव, कुणकेरी (ता. सावंतवाडी), आकेरी (ता. कुडाळ), फोंडा (ता. कणकवली), करूळ (ता. वैभववाडी) या गावांमध्ये सुरंगीचा लागवड आहे. सध्या सुरंगी हंगामाला गती प्राप्त झाली आहे.

महिनाभरच हा हंगाम चालतो. झाडाच्या खोडाला कणी आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत ती काढणीयोग्य होते. शेतकऱ्यांचा कळी (बटमोगरा) काढण्यावर अधिक भर असतो. या मालाला बाजारपेठेत चांगला दर मिळतो. सुरंगीची बाजारपेठ मोठी असून व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन माल खरेदी करतात. सध्या कळीला प्रतिकिलो ७०० रुपये दर असून सरसकट प्रतिकिलो ५५० ते ६०० रुपये दराने सुरंगी खरेदी केली जात आहे. सुरंगीचा हंगाम अद्याप दहा ते बारा दिवस चालेल असा अंदाज आहे.

  • १५ गावांमध्ये सुरंगीचे ४५ हेक्टर क्षेत्र आहे.

  • झाडाच्या आकाराप्रमाणे प्रतिझाड पाच ते सहा किलोपासून ७० ते ८० किलोपर्यंत उत्पादन देते

  • सुरंगीचे गजरे, वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेत ५० रुपयांना विक्री केल्या जातात

  • सुरंगी उत्पादनात जिल्ह्यातील सुमारे ८५० कुटुंबे आहेत

  • दिल्ली, अहमदाबाद, उज्जैनसह विविध शहरांत मागणी असून ७० टक्के आयुर्वेदिक औषधांसाठी तर २० ते ३० टक्के वापर सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी केला जातो.

  • सुरंगीची उलाढाल १५ कोटींपर्यंत होते.

* प्रतिकिलोला मिळालेला दर

२०२१ ः ४०० रुपये

२०२२ ः ६०० ते ६५०

२०२३ ः ६५० ते ७००

२०२४ ः ७०० रुपये

माझी सुरंगीची २५ झाडे असून गेल्या सात-आठ दिवसांपासून काढणीला सुरुवात झाली आहे. पुढील दहा ते बारा दिवस हा हंगाम सुरू राहील. सध्या कळीला ७०० रुपये तर मिश्रीत फुलांना ५५० ते ६०० रुपये दर मिळत आहे. या व्यवसायातून दोन लाख रुपये उलाढाल होईल असा अंदाज आहे.
- तातोबा कुडव, सुरंगी उत्पादक, आरोली, ता. वेंगुर्ला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Husbandry Schemes: पशुसंवर्धन विभागाच्‍या योजना ठप्‍प झाल्याने शेतकरी अडचणीत

Agriculture Department: कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरभरारी पथक ठेवणार नजर

AI In Agriculture: ‘एआय’ तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढवा

Summer Mung: उन्हाळी मुगाची लागवड देतेय आर्थिक आधार

Chana Tur Disease: हरभरा, तूर पिकांवर रोग प्रादुर्भावाचे सावट

SCROLL FOR NEXT