Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ६२०० ते ७९२५ रुपये

जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७९२५ रुपये तर सरासरी ७८७० रुपये दर मिळाले.

Team Agrowon

Cotton Market Update परभणी ः जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत (Selu APMC) सोमवारी (ता. २०) कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७९२५ रुपये तर सरासरी ७८७० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत शुक्रवारी (ता. १७) कापसाची १२७४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५१० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७८७० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १६) कापसाची ११७९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६६२० ते कमाल ७९६० रुपये तर सरासरी ७८८५ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १५) कापसाची १३४१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६७०५ ते कमाल ७८९५ रुपये तर सरासरी ७८१० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत शनिवारी (ता. १८) कापसाची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ८०१५ रुपये तर सरासरी ७९५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १७) कापसाची १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७९६५ रुपये तर सरासरी ७८७० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १६) कापसाची २१०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७९३० रुपये तर सरासरी ७८१० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १५) कापसाची २६५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८००५ रुपये तर सरासरी ७९०० रुपये दर मिळाले.

परभणी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमधील कापसाचे दर नरमलेले आहेत. किमान दर साडेसहा हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत.किमान दर आठ हजार रुपयांच्या जवळपास आहेत. कापसाच्या दरात शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार सुधारणा होत नाही. त्यामुळे कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

Ativrushti Madat: परभणी, हिंगोलीकरिता ६० कोटी ७३ लाख मंजूर

Rangada Kanda Cultivation: रांगडा कांदा लागवडीचे सुधारित तंत्र

Crop Harvesting Experiment: शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक कापणी प्रयोगाकडे

Agrowon Diwali Article: निसर्ग, परिसंस्थेसोबत जोडून घ्या...

SCROLL FOR NEXT