Kolhapur Bhendwade Villagers Protest At Sharad Sugar Factory: कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) भेंडवडे ग्रामस्थांनी धडक मोर्चा नेला. या ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला.हा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा कारखाना आहे. या कारखान्यातून वारणा नदीत दूषित पाणी सोडण्यात येत असल्याचा भेंडवडेसह शेजारील गावांतील ग्रामस्थांचा आरोप आहे. .कारखाना परिसरात ग्रामस्थांनी ठिय्या दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखान्यातून मळीमिश्रित आणि काळे पाणी वारणा नदीत सोडण्यात आहे. यामुळे पाणी प्रदूषित होत असून याचा शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. .Hanumangarh Ethanol Factory: राजस्थानच्या हनुमानगडमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे इथेनॉल प्रकल्प रद्द.नदीत कारखान्याचे सांडपाणी पाणी सोडले जात असल्यावरुन ग्रामस्थांनी याआधी अनेकवेळा कारखाना प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती. तसेच तोंडी सूचनाही दिल्या होत्या. पण, तरीही कारखान्याकडून सांडपाणी सोडणे बंद झाले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मोर्चा काढून कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वाद वाढल्याने कारखान्याच्या दिशेने दगडफेकही करण्यात आली. यामुळे तणाव वाढला. तसेच काही वेळ कारखान्याचे कामकाजही थांबले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. येथील तणाव निवळला नसल्याने अतिरिक्त पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे. .Sugar Factory: आदेश नसतानाही तपासले साखर कारखान्यांचे वजनकाटे.जोपर्यंत कारखान्याकडून ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.