Crop Loan Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Crop Loan : पीककर्ज वितरणाचे ५९८ कोटींचे उद्दिष्ट

गेल्या वर्षी बॅंकेने रब्बीसाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्जवितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जात जवळपास १८ कोटीने वाढ केली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : परतीचा चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे क्षेत्र (Rabi Acreage) वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात (Rbi Season) शेतकऱ्यांना पेरणीसाठी (Rabi Sowing) लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५९८ कोटी ३५ लाख रुपयांचे पीक कर्जवितरणाचे (Crop Loan Distribution) उद्दिष्ट ठेवले आहे. कर्जवितरणाची प्रकिया सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बॅंकेने रब्बीसाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्जवितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जात जवळपास १८ कोटीने वाढ केली आहे. यंदा एकूण ५९४ कोटी ५ लाख रुपयांचे पीक कर्ज, अल्पमुदतीमध्ये दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय अशा बाबींसाठी ४ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवितरण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या जवळपास ३०० शाखांमार्फत सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करेल. सध्या बँकेकडून शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने दिले जात आहे. रब्बी पिकांव्यतिरिक्त बँक ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठी पीक कर्ज देणार आहे.

रब्बीचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट

तालुका उद्दिष्ट

आंबेगाव ५८ कोटी ७४ लाख ५० हजार रुपये

बारामती ४० कोटी ७४ लाख २५ हजार

भोर १८ कोटी ९८ लाख रूपये

दौंड ७५ कोटी ६० लाख २० हजार

हवेली ९ कोटी २० लाख ५० हजार

इंदापूर १२५ कोटी ५० लाख २५ हजार

जुन्नर ६३ कोटी ९९ लाख २५ हजार

खेड ५६ कोटी ३५ लाख ७५ हजार

मावळ १९ कोटी ८० लाख ५० हजार

मुळशी १७ कोटी २० लाख ३० हजार

पुरंदर २८ कोटी २ लाख ७५ हजार

शिरूर ८० कोटी ३ लाख ७५ हजार

वेल्हा ४ कोटी १५ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम

Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Farmers Support: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहायला हवे

Farmers Protest: राज्य सरकारच्या निषेधार्थ परभणीत आंदोलने

Dams Status: आवक घटल्याने प्रकल्पांची पाणीपातळी स्थिर

SCROLL FOR NEXT