Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Rate : खाऊच्या पानाच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ

Latest Agriculture Market : श्रावणामुळे खाऊच्या पानांच्या मागणी वाढल्याने दरातही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : श्रावणामुळे खाऊच्या पानांच्या मागणी वाढल्याने दरातही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. गणपती उत्सवामुळे पानांच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढतील आणि ते टिकून राहतील, अशी शक्यता पान उत्पादकांनी वर्तविली आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बाजारात खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पान उत्पादक पानाचा खुडा बाजारपेठेतील मागणीनुसार करू लागले असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात फाफडाला ४००० ते १२ हजार रुपये, कळी पानाला २००० ते ८००० रुपये (एक डाग) असा दर मिळाला होता.

त्यानंतर अधिक महिना आल्याने बाजारपेठेत पानांची मागणी कमी झाली होती. त्याचा परिणाम दरावरही झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फाफडा पानाला ३००० ते ५००० तर कळी पानाला २००० ते ३५०० रुपये (एक डाग) असा दर मिळाला होता.

पंढरपूर, सोलापूर, कोकणासह अन्य बाजारपेठांतून श्रावण महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी वाढली आहे. पानांची आवकही चांगली होत आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे.

सध्या फाफडा पानाला ३५०० ते ८००० तर कळी पानाला २५०० ते ४५०० रुपये (एक डाग) असा दर मिळत आहे. अर्थात गेल्या महिन्यात दर पाच ते दहा टक्के वाढले असल्याचे पान उत्पादकांना सांगितले. श्रावण संपल्यानंतर लगेच गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यामुळे या सणानिमित्त पानांच्या मागणीत वाढ होऊन दरात वाढ होईल, अशी आशा आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात पानांची मागणी वाढली आहे. श्रावणामुळे बाजारात पाच ते दहा टक्क्यांनी दर वाढले आहेत. गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर दर वाढतील.
- प्रभाकर नागरगोजे, पान उत्पादक, नरवाड, ता. मिरज, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT