Ethanol Blending Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Blending : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणात चार वर्षांत ५ टक्क्यांनी वाढ

Ethanol Production : देशात पेट्रोलमध्‍ये इथेनॉलच्या मिश्रणाच्या प्रमाणात गेल्या चार वर्षांत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ अखेर मिश्रणाचे प्रमाण १३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात पेट्रोलमध्‍ये इथेनॉलच्या मिश्रणाच्या प्रमाणात गेल्या चार वर्षांत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ अखेर मिश्रणाचे प्रमाण १३ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ८.१ टक्क्यांवर होते. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेलच्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी संस्था तसेच खासगी कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेलने मिश्रणाची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदाच्या जून महिन्यातील मिश्रणाचे प्रमाण १५.९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

२०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. गेल्या वर्षी साखर उद्योगावर इथेनॉलनिर्मितीसाठी साखरेचा वापर करण्यावर निर्बंध आणल्यानंतर इथेनॉल उत्पादन व पर्यायाने मिश्रण यावर काहीसा विपरीत परिणाम झाला.

यातच मक्यासारख्या पिकाचे उत्पादन कमी झाले तसेच तांदळापासून इथेनॉल निर्मितीलाही बंदी घातल्याने गेल्‍या वर्षी काहीसा ब्रेक लागला. अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी शिल्लक इथेनॉलचा वापर मिश्रणासाठी करून इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण कायम राखण्याचा प्रयत्न केला. यामुळे मिश्रणाचे प्रमाण फारसे घटले नाही. जून २०२४ अखेर १४४७६ आउटलेट्समधून मिश्रणाचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारने गेल्या तीन ते चार वर्षांपासून इथेनॉल निर्मितीबरोबर पेट्रोलमध्ये त्याचे मिश्रण वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्‍पांसाठी परवानगी देण्यास गती देण्याबरोबरच केवळ इथेनॉलसाठीचे स्‍वतंत्र प्रकल्प उभारण्‍यासाठी सुलभता आणली.

गेल्या वर्षीपर्यंत इथेनॉलचे उत्पादन वेगात सुरू होते. २०२०-२१ ला ८.१ टक्क्यांवर प्रमाण होते. २०२१-२२ ला हे प्रमाण १० टक्यावर गेले. २०२२-२३ ला १२.१ टक्के इतके प्रमाण झाले. आता जून अखेर हे प्रमाण १३ टक्क्यांवर गेले आहे.

केंद्राच्या निर्णयावर गती अवलंबून

साखर उद्योग हा इथेनॉल निर्मितीचा महत्वाचा स्रोत आहे. केंद्राने कमी साखर उत्पादनाच्या भितीने गेल्‍या वर्षी साखरेपासून इथेनॉलला बंदी आणली. यामुळे उत्पादनात घट झाली. हंगाम संपल्यानंतर बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलला परवागी दिली. पण पूर्ण साखर हंगाम मंदगतीनेच इथेनॉलनिर्मिती झाली.

यंदा मात्र साखर उद्योग इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध पूर्ण उठविण्याच्या अपेक्षेत आहे. केंद्राने जास्‍तीत जास्त साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी दिल्‍यासच यंदा समाधानकारक इथेनॉलनिर्मिती होऊ शकेल, असे साखर उद्योगाचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT