Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन ४५०० ते ४८९५ रुपये

Soybean Market Update : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट)मध्ये शुक्रवारी (ता. २) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होती.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट)मध्ये शुक्रवारी (ता. २) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४८९५ रुपये तर ४६९७ रुपये दर मिळाले. हिंगोली धान्य बाजारातील सोयाबीनच्या दरात किंचित चढ उतार होत आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून दरात नरमाईच आहे.त्यामुळे दर सहा हजारांवर जातील या अपेक्षेने अद्याप सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरासाठी सोयाबीनची मागणी वाढेल.

परिणामी, दरात सुधारणा होण्याची शक्यता वाटत होती. परंतु अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरचे बियाणे राखीव ठेवले आहे. त्यामुळे बियाणे वापरासाठी मार्केटमधील सोयाबीनला सध्यातरी फारशी मागणी दिसत नाही.

परिणामी, सोयाबीनचे दर पाच हजारांच्या खालीच आहेत. किमान दर हमीदराच्या जवळ येऊन ठेपले आहेत. हिंगोली धान्य बाजारात गुरुवारी (ता. १) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४८५० रुपये, तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ३१ मे) सोयाबीनची ६९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५९५ ते कमाल ४९४४ रुपये, तर सरासरी ४७६९ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. ३० मे) सोयाबीनची ८२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६१५ ते कमाल ५०५७ रुपये, तर सरासरी ४८३६ रुपये दर मिळाले.

खरिपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे आदी निविष्ठांची तजवीज करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्रीस आणत आहेत. त्यामुळे दररोज ५०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT