Cotton, Soybean Rate : कापूस, मका, सोयाबीनच्या दरात घसरण

Maize Rate Update : गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात मका व तूर वगळता इतर पिकांचे भाव घसरले.
Cotton, Soybean Rate
Cotton, Soybean RateAgrowon

फ्यूचर्स किमती - सप्ताह २० ते २६ मे २०२३

Cotton Bajarbhav : गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात मका व तूर वगळता इतर पिकांचे भाव घसरले. कापसाचे भाव ५.७ टक्क्यांनी, तर हळदीचे २ टक्क्यांनी घसरले. तुरीच्या दरात वाढीचा कल याही सप्ताहात टिकून राहिला.

१९ मे रोजी संपलेल्या सप्ताहात सर्व पिकांची आवक गेल्या सप्ताहांच्या तुलनेने लक्षणीय वाढली. मे महिन्यात आतापर्यंत कापूस, मका व सोयाबीन यांच्या किमती घसरत आहेत. यापुढील काळात खरीप हंगामातील पाउस व लागवडीखालील क्षेत्र यांचा परिणाम किमतींवर होईल.

२६ मे रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. ५९,६६० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ५.७ टक्क्यांनी घसरून रु. ५६,२०० वर आले आहेत. जून फ्यूचर्स भाव ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ५८,१२० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स रु. ५९,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४६८ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ५.३ टक्क्यांनी घसरून रु. १,३९० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ९.४ टक्क्यांनी अधिक आहेत. साठवणी खर्चापेक्षा हा फरक अधिक असेल तर फ्यूचर्स मध्ये विकण्याचा विचार करावा.

Cotton, Soybean Rate
Maize Soybean Market : कापूस, मका, सोयाबीनमध्ये उतरता कल

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात मात्र त्या १.१ टक्क्याने वाढून रु. १,८२० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमतीसुद्धा १ टक्क्याने वाढून रु. १,८२९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १,८५० वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.६ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ५.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,६३६ वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,४८५ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. ८,०५० वर आल्या आहेत.

ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. ८,३७५ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ११.९ टक्क्यांनी अधिक आहेत. ऑक्टोबर भावसुद्धा (रु. ८,७०२) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अजून अनुकूल संधी आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने वाढून रु. ४,९५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ४,८५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) या सप्ताहात रु. ८,१०० वर आली आहे. आवक कमी आहे. मे महिन्यात किंमतवाढीचा कल आहे.

Cotton, Soybean Rate
Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,१८९ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.७ टक्क्याने घसरून रु. ५,१५१ वर आली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात २.६ टक्क्यांनी वाढून रु. ८,८०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

लेखक ई-मेल : arun.cqr@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com