Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची ४०० कोटींची उलाढाल

Mango Rate : जिल्ह्यातील आंबा हंगाम जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपला आहे. जिल्ह्यातून अंदाजे ७० हजार टन आंबा उत्पादन झाले आहे. तर साधारणपणे या वर्षीच्या हंगामात ४०० कोटींची उलाढाल झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील आंबा हंगाम जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपला आहे. जिल्ह्यातून अंदाजे ७० हजार टन आंबा उत्पादन झाले आहे. तर साधारणपणे या वर्षीच्या हंगामात ४०० कोटींची उलाढाल झाली आहे.

जिल्ह्याती सर्वाधिक आंबा उत्पादन देवगड तालुक्यात घेतले जाते. येथील देवगड हापूस आंब्याला जगभरात पसंती आहे. याशिवाय वेंगुर्ले, मालवण तालुक्यात आंबा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत देखील आंबा लागवड आहे. परंतु हे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. या वर्षीचा नियमित हंगाम मार्च अखेरपासून सुरू झाला. तत्पूर्वी नोव्हेंबरपासून अल्प प्रमाणात आंबा उत्पादन सुरू होते.

येथील आंबा देशासह परदेशात देखील विक्रीसाठी जातो. अधिकतर आंबा वार्शी मार्केटमध्ये जातो. अलीकडे थेट विक्रीचे प्रमाण देखील वाढले आहे. याशिवाय आंबा महोत्सवाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आंबा विक्री झाली.

या वर्षीच्या हंगामात साधारणपणे ७० हजार टन आंबा जिल्ह्यातून उत्पादित झाला. यापैकी ४० हजार टन आंबा एकट्या देवगड तालुक्यात उत्पादित झाला. यातील हंगामाच्या अखेरीस उत्पादित झालेला दहा ते बारा टक्के आंबा कॅनिंगसाठी वापरण्यात आला.

या वर्षी सुरुवातीच्या हापूस आंब्याच्या प्रति पेटीला ४ ते ५ हजार रुपये दर मिळाला. त्यानंतर हंगामाच्या अखेरीपर्यंत आंब्याला प्रतिपेटी २ हजार ३०० ते ३ हजारांपर्यंत दर राहीला. पूर्ण हंगामात सरासरी २ ते २ हजार ५०० रुपये पेटीला मिळाला. या वर्षीच्या संपूर्ण हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याची उलाढाल साधारणपणे ४०० कोटींपर्यंत झाली आहे. कॅनिंग आंब्यामधून साधारणपणे २५ ते ३० कोटींपर्यंत उलाढाल झाली.

देवगड तालुक्यातून या वर्षी हंगामात साधारणपणे ४० हजार टन सरासरी आंबा उत्पादित झाला. यातून या तालुक्याची आर्थिक उलाढाल २०० ते २५० कोटींपर्यंत झाली. परंतु वाढलेल्या कीड-रोगांचा प्रादुर्भावामुळे आंबा बागायतदारांना उत्पादनखर्च अधिक आला. प्रति पेटीमागे किमान १ हजार ते १२०० रुपये उत्पादनखर्च आला आहे. त्यामुळे जरी उलाढाल मोठी असली तरी बागायतदारांच्या हातात तुटपुंजीच रक्कम आली.
- विद्याधर जोशी, आंबा बागायतदार, देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT