Amravati News : स्थानिक फळ व बाजार समितीत आंबा आवक कमी होण्याची नाव घेत नसून सध्या ती विक्रमी १३०० क्विंटलवर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४२० क्विंटल आवक ही नीलम जातीच्या आंब्याची असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
अमरावती बाजार समितीत सद्यःस्थितीत दशहरी आंब्याची ३७० क्विंटलची आवक होत आहे. याला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. याच वेळी तोतापुरी आंब्याची २४० क्विंटलची आवक असून, ३००० ते ३५०० याप्रमाणे याचे व्यवहार होत आहेत.
बाजारात सर्वाधिक ४२० क्विंटल नीलम जातीच्या आंब्याची आवक होत आहे. तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा दर याला मिळत आहे. १५० क्विंटल इतकी कैरीची आवक होती. सध्या कैरीच्या दरात तेजी आहे.
३००० ते ५००० रुपये प्रमाणे कैरीचे व्यवहार होत आहेत. २५०० ते ३००० या दराने स्थानिक मख्खन जातीच्या आंब्याची विक्री होत असून याची आवक १२० क्विंटल इतकी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दशेहरी आंब्याची रोज आवक सरासरी ३७० क्विंटल होती. याचे दर ३५०० ते ४२०० रुपये क्विंटल राहिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.