Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : खानदेशात कापूस दरात २०० रुपये सुधारणा

खानदेशात मागील तीन दिवसांत कापूस दरात क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा झाली आहे. खेडा खरेदी किंवा थेट खरेदीत कापसाला ७७०० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Cotton Market Rate News जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवसांत कापूस दरात क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

खेडा खरेदी किंवा थेट खरेदीत कापसाला ७७०० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

मागील पाच ते सात दिवसांपूर्वी खेडा खरेदीत कापसाला ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. परंतु दरात सुधारणा झाली आहे.

खंडीचे दर (३५६ किलो रुई ६२ हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत. सरकीचे दर मात्र स्थिर आहेत. खानदेशात अद्यापही कापसाची आवक कमी आहे.

धुळे, जळगाव व नंदुरबारात मिळून रोज सहा हजार गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची आवक होत आहे. अर्थात ३० ते ३५ हजार क्विंटल कापसाची आवक खानदेशात रोज होत आहे.

ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. यामुळे दर स्थिर आहेत. वायदा बाजाराबाबत सरकारने सकारात्मक कार्यवाही केल्याने दरात किंचित सुधारणा झाल्याचेही बाजारात चर्चिले जात आहे.

रोज सहा ते साडेसहा हजार गाठींची निर्मिती खानदेशात होत आहे. परंतु निर्यातीबाबत समाधानकारक चित्र नाही.

सूतगिरण्यांकडून काहीशी मागणी सध्या येत आहे. परंतु मोठे सौदे अद्याप होत नसल्याची स्थिती आहे. मागील हंगामात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शेतकऱ्यांकडे फक्त २० टक्के कापूससाठा होता.

यंदा मात्र कारखानदारांकडे कमी व शेतकऱ्यांकडे अधिक कापूससाठा आहे. यामुळेदेखील दरांबाबत सकारात्मक चित्र नसल्याचे जाणकार सांगत आहेत.

शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपल्यानंतर कापूस बाजाराची चाल गती घेते, दर वधारतात, अशी स्थिती राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विक्री टाळल्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभऱ्याला हमीभावही नाही; सोयाबीन दर स्थिर, मक्याचे दर दबावात, तुरीचे दर घसरले तर संत्र्याची आवक मर्यादित

Sugarcane Crop Management: ऊस पिकातील चुका शोधण्याची गरज

Sangli Cane Crushing: सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांचे गाळप सुरू

Kolhapur News: कोल्हापुरातील कारखान्यांच्या वजनकाट्यांची आदेश नसताना तपासणी, बिंग फुटलं, नेमकं प्रकरण काय?

Paus Andaj: पावसाला पोषक हवामान; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी

SCROLL FOR NEXT