Onion Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा लिलाव बंदमुळे १५० कोटींवर उलाढाल ठप्प

Onion Procurement : परिणामी ९ लाख क्विंटल आवक तुंबली असून १५० कोटींवर उलाढाल ठप्प झाली आहे. एकीकडे व्यापारी मागण्यांवर ठाम आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. २२) येवला येथे झालेल्या बैठकीत मागण्यांवर ठाम राहत मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या सुट्टीपासून ६ दिवस कामकाज बंद आहे.

परिणामी ९ लाख क्विंटल आवक तुंबली असून १५० कोटींवर उलाढाल ठप्प झाली आहे. एकीकडे व्यापारी मागण्यांवर ठाम आहेत. तर मंगळवारी (ता. २६) पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत यासंबंधी बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील निर्णय अद्याप अधांतरी असल्याने यात फक्त शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

कांदा निर्यातीवर लादलेला ४० टक्के निर्यात शुल्क यासह प्रमुख पाच मागण्यांवर कांदा व्यापारी अडून बसले आहेत. त्यामुळे बाजार आवारात शुकशुकाट आहे. गेल्या सहा महिन्यांपासून उन्हाळा कांदा उत्पादन खर्चाच्या खाली दराने विकला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण आहे.

अशा परिस्थितीत दर वाढल्यानंतर हस्तक्षेप करणारे केंद्र सरकार व शेतकऱ्यांची खूप कणव सांगणारे राज्य सरकार याप्रश्नी हस्तक्षेप करण्यासाठी वेळीच पुढे आलेले नाही. अशा अडचणीच्या काळात कांदा लिलाव बंद असल्याने कांदा चाळीत सडतो आहे. तर पावसामुळे कांदा सडण्याचा वेग वाढत आहे. तर आता विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो.

कांदा उत्पादक संघटनेची आज बैठक

कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटवणे, ‘नाफेड व एनसीसीएफ’चा कांदा बंद करणे आणि जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून बंद असलेले कांदा लिलाव या विषयांवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची सोमवारी (ता. २५) सकाळी १० वाजता लासलगाव बाजार समितीच्या कांदा आवारात बैठक बोलावली आहे.

त्यासाठी शेतकरी उपस्थित राहणार आहे. पूर्वी व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत बाजार कामकाज बंद ठेवले आहे. त्यातच राज्य कांदा उत्पादक संघटनेची बैठक होणार असल्याने त्यास काय वळण मिळते हे बैठकीअंती स्पष्ट होईल. जिल्ह्यात आता कांदा प्रश्न चांगलाच पेटत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT