Onion Market : ...तर राज्यातील व्यापारीही बंदमध्ये सहभागी होणार

Onion Market Update : २६ सप्टेंबरच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील व्यापारीही बंदमध्ये सहभागी होतील,’’ अशी माहिती जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘‘शेतकरी हितासाठी उद्या (ता. २५) पासून व्यापारी कांदा लोडिंग करणार नाहीत. मंगळवारी (ता.२६) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय होईपर्यंत व्यापाऱ्यांनी पुकारलेले लिलाव बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. २६ सप्टेंबरच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील व्यापारीही बंदमध्ये सहभागी होतील,’’ अशी माहिती जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली.

येवला येथील कलंत्री लॉन्सवर शुक्रवारी (ता.२२) जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. खंडू देवरे अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील कांदा व्यापारी उपस्थित होते. आंदोलन कायम ठेवण्यासह शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

Onion Market
Onion Auction Nashik : नाफेड आणि एनसीसीएफची चौकशी होणार, जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन सुरू केल्याने लिलाव ठप्प आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्यांत तीन दिवसांपासून कांद्याची सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प आहे. गुरुवारी (ता.२१) पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्वांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या होत्या.

केंद्र शासनाने कर्नाटक व आंध्र प्रदेशातील कांदा निर्यातीला ४० टक्के निर्यातमूल्य न लावता परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात मूल्य लावले. हा दुजाभाव कांदा व्यापारी सहन करणार नाहीत. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा निर्यात अडचणीत आहे.

त्यामुळे कांदा व्यापारी शेतकऱ्यांच्या कांद्याचे लिलाव करू शकत नसल्याने हा निर्णय जोपर्यंत मागे घेतला जात नाही, महाराष्ट्राबाबतचा दुजाभावाचा निर्णय जोपर्यंत बदलला जात नाही, तोपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

Onion Market
Onion Market : कांदा लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम

२६ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बैठकीत काही ठोस निर्णय होऊन कांदा व्यापारी संघटनेने केलेल्या मागण्या मान्य झाल्या, तरच कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील; अन्यथा व्यापारी बेमुदत संपात सहभागी होतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या वेळी सोहनलाल भंडारी, संतोष अट्टल, प्रवीण कदम, जितू कापडणीस, अतुल गाडे, नंदू अट्टल, सचिन मुथा, मनीष बोरा, रामेश्वर कलंत्री आदींसह जिल्ह्यातील कांदा व्यापारी उपस्थित होते.

‘२६ च्या बैठकीवर सर्व काही अवलंबून’

बैठकीत नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली. मात्र शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. शेतकरी हितासाठी आमच्याकडील माल लोडिंग करणार नाही. आजच्या बैठकीत २६ तारखेला काय मुद्दे मांडायचे, याबाबत चर्चा झाली आहे.

आमचे मुद्दे मान्य झाले नाहीतर राज्यातील व्यापारी पाठिंबा देतील. ‘नाफेड’चा बफर स्टॉक आणि निर्यात शुल्काबाबत आम्ही ठाम असून मार्केट शुल्क एक रुपयावरून ५० पैसे करण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांकडे कांदा असेल, तर ते बाहेरच्या राज्यात जाऊन विकू शकतात. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आता २६ तारखेच्या बैठकीनंतरच सर्वकाही ठरेल, असे देवरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com