Silver Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

Gold Rate : सोने-चांदी दरात मागील काही दिवस सतत वाढ सुरू आहे. चांदी दरांनी विक्रम केला असून, एकाच दिवसात १४०० रुपयांची वाढ एक किलो चांदीमागे झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सोने-चांदी दरात मागील काही दिवस सतत वाढ सुरू आहे. चांदी दरांनी विक्रम केला असून, एकाच दिवसात १४०० रुपयांची वाढ एक किलो चांदीमागे झाली आहे. आता चांदी दर प्रतिकिलो ७८ हजार ४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

शुक्रवारी (ता.१७) चांदी दरात एक किलोमागे १४०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे हे आजपर्यंतचे विक्रमी दर आहेत. चांदी दरात मागील दोन महिने सतत चढ-उतार सुरू आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला दरवाढ झाली होती. २० ते २२ दिवसांत चांदी दरात चार हजारांची वाढ एक किलोमागे झाली.

यानंतर एप्रिलच्या अखेरीस दरात घसरण झाली व दर स्थिरावले. मे महिन्यात सुरुवातीला दर स्थिर होते. परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दरात वाढ दिसू लागली. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चांदी दरात किलोमागे सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाली. यानंतर चांदी दर ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलो, असे झाले.

१३ मे ते १७ मे या कालावधीत चांदी दरात वाढ सतत झाली आहे. १३ मे रोजी एक किलोमागे ५०० रुपयांची वाढ झाली. पुन्हा १४ मे रोजी एक किलोमागे ५०० रुपयांची वाढ झाली. १६ मे रोजी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ नोंदविली गेली. तर १७ मे म्हणजेच शुक्रवारी दर एक किलोमागे १४०० रुपयांनी वाढले व दरांनी ८७ हजार रुपये प्रतिकिलोची पातळी पार केली.

सोने दरातही किंचित वाढ

सोने दरही एप्रिलपासून सतत वाढत आहेत. मध्यंतरी दरात काहीशी घसरण झाली होती. या आठवड्यातही घसरण दिसली. सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोने दर प्रतितोळा (१० ग्रॅम) ७३ हजार ८०० रुपये, असे आहेत.

सोने व चांदी दरात वाढीचा कल असल्याने लग्नसराईत ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. परंतु ग्रामीण भागातून सोने-चांदीसंबंधी फारशी गुंतवणूक येथे होत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT