Crop Insurance Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rabi Crop Insurance : रब्बी हंगामात आतापर्यंत १३ लाख हेक्टर पिकांना विमा संरक्षण; विमा अर्ज भरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Rabi Season : रब्बी हंगामात पीक विमा योजनेत आतापर्यंत १८ लाख ७९ हजार विमा अर्ज दाखल आहेत. गेल्या रब्बीच्या तुलनेत आतापर्यंत अर्जांची संख्या केवळ २६ टक्के आहे.

Anil Jadhao 

Pune News : रब्बी हंगामात पीक विमा योजनेत आतापर्यंत १८ लाख ७९ हजार विमा अर्ज दाखल आहेत. गेल्या रब्बीच्या तुलनेत आतापर्यंत अर्जांची संख्या केवळ २६ टक्के आहे. ज्वारीचा विमा काढण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरला तर गहू, कांदा आणि मक्याचा विमा काढण्यासाठी १५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपण पेरलेल्या पिकाचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

आतापर्यंत विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी दिसते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे यंदा रब्बीची पेरणी उशीरा होत आहे. खरिपाचा पेरा उशीरा झाल्यामुळे खरिपातील पिकांची काढणीही उशीरा झाली. खरिपाची पिके काढल्यानंतर रब्बीची पेरणी होते. त्यामुळे रब्बीचा पेरा यंदा उशीरा होत असल्याचे दिसत आहे. पण पेरणीची गती गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. कारण पेरणीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढच्या काळात विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता आहे.

गेल्या रब्बी हंगामात ७१ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. आतापर्यंत मात्र १८ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. म्हणजेच गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात जेवढे शेतकरी अर्ज आले होते त्याच्यातुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ २६ टक्के शेतकरी अर्ज आले आहेत. तर शेतकऱ्यांनी आतापर्यंत १३ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले.

शेवटची तारीख

राज्य सरकारने रब्बी हंगामातही शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा दिला आहे. रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये विमा भरण्याची अंतिम तारिख जवळ आली आहे. रब्बी ज्वारीचा विमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारिख आहे. तर गहू, हरभरा आणि कांद्याचा विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. 

गैरप्रकारांपासून दूर राहा…!

गेल्या हंगामात काही लोकांनी चुकीच्या पध्दतीने विमा काढला होता. त्याविषयी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी पडून दुसऱ्याच्या शेतावर, शासकीय जमिनीवर, मंदिर , मज्जिद, ट्रस्ट, औद्योगिक वापर क्षेत्रावर  सारख्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर, पीक पेरणी केली नसताना, पेरणी क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्रावर, तसेच बोगस ७/१२ उतारा जोडून विमा योजनेत भाग घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पेरणी केलेल्या पिकाचाच विमा घ्यावा. विमा योजनेत भाग घेण्यासाठी www.pmfby.gov.in संकेत स्थळावर नोंदणी करावी. काही अडचणी किंवा शंका असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT