Jayakwadi Dam : जायकवाडीतून रब्बी, उन्हाळी हंगाम आवर्तने

Jayakwadi Water Update : मराठवाड्यातील सर्वांत मोठा जायकवाडी प्रकल्प तुडुंब असल्याने त्यामधून अपेक्षित सिंचनाची अपेक्षा वाढली आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील सर्वांत मोठा जायकवाडी प्रकल्प तुडुंब असल्याने त्यामधून अपेक्षित सिंचनाची अपेक्षा वाढली आहे. शिवाय नोव्हेंबरच्या अखेरच्या दहा दिवसांत पहिला आवर्तन सुटण्याची आशा आहे.

जायकवाडी प्रकल्पात यंदा अपेक्षित पाणीसाठा झाला आहे. अपेक्षित पाणीसाठा झाला की पिण्याच्या पाण्यासह या प्रकल्पावर होणारा सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागतो. प्रकल्पाचे डाव्या कालव्यावरून साधारणतः १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. तर उजव्या कालव्याच्या आधारे जवळपास ४१ हजार हेक्टरला सिंचनासाठी पाणी मिळू शकते.

Jayakwadi Dam
Ujani Dam : उजनी धरणातून शेतीला यंदा गरजेनुसार सुटणार ३ आवर्तने, १११ टीएमसी पाणीसाठी शिल्लक

याशिवाय प्रकल्पावरून लहान-मोठ्या जवळपास २७ पाणीपुरवठा योजना पाणी मिळेल हे सुद्धा प्रकल्प तुडुंब झाल्याने स्पष्ट झाले आहे. गतवर्षी प्रकल्पात ५० टक्के ही उपयुक्त पाणीसाठा नव्हता. यंदा मात्र चित्र बदलले आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तने प्रकल्पातून सिंचनासाठी दिली जातील, अशी आशा आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Canal : जायकवाडी डाव्या कालव्याच्या पाणी आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

नोव्हेंबरच्या २० ते ३० तारखेदरम्यान सिंचनासाठी पहिला आवर्तन सोडल जाण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्याने ही आवर्तन साधारणतः २५ जून पर्यंत सोडणे सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. कालवा समितीची बैठक झाली नाही ती आचारसंहिता झाल्यानंतर होण्याचे आशा आहे. माहितीनुसार यंदा एक जून पासून आतापर्यंत गोदावरी पात्रातून जायकवाडी प्रकल्पात साधारणतः १०९.४९ टीएमसी पाणी आले.

त्यापैकी जवळपास २९.३७ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीपात्रात करावा लागला. खरिपातील पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा रब्बीवर आहेत. जायकवाडी तुडुंब झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या अशा उंचावल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com