Ova Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ova Market : शेगावमध्ये ओवा ११ हजार रुपये

सध्या बाजार समित्यात ओव्याची आवक सुरू झाली असून शेगाव (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान आठ हजारांपासून कमाल ११ हजार रुपयांपर्यंत शेतीमाल विक्री होत आहे.

Team Agrowon

Akola News : सध्या बाजार समित्यात ओव्याची आवक (Ova Arrival) सुरू झाली असून शेगाव (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान आठ हजारांपासून कमाल ११ हजार रुपयांपर्यंत शेतीमाल विक्री होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ओव्याची आवक होत असते. शेगाव बाजार समितीत खरेदीदार असल्याने तेथे सध्या २५ ते ३० क्विंटलपर्यंत दैनंदिन आवक होत आहे.

मसालेवर्गीय ओव्याचे पीक हे पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून काही शेतकरी लागवड करतात. रब्बी हंगामात ओव्याची लागवड केल्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात काढणी केली जाते. कमी पाण्यात येणारे हे पीक अनेक शेतकरी वर्षानुवर्षे घेतात.

यंदाच्या हंगामातील ओवा सध्या किमान आठ हजार व कमाल ११ हजारांपर्यंत विकत आहे. शेगाव बाजार समितीत सोमवारी (ता. ३) ओवा कमाल ११ हजार ५०५ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. उन्हाळाभर ओव्याची कमी अधिक प्रमाणात या बाजारात आवक होत असते.

रब्बीत गहू, हरभरा या पिकांपेक्षा ओव्याला खारपाण पट्ट्यात काही गावांमध्ये पसंती दिली जाते. यंदा परतीचा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने ही लागवड काही शेतकऱ्यांनी प्रामुख्याने शेगाव, बाळापूर, अकोट, तेल्हारा आदी तालुक्यांत केली होती. आता काढणी आटोपली असून ओव्याची विक्री सुरू झाली आहे.

बाजार समितीत उन्हाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने ओव्याची आवक होते. ही आवक २५ ते ३० क्विंटलदरम्यान राहते. येथे ओव्याचे खरेदीदार असल्याने विविध भागांतील शेतकरी हा माल विक्रीला आणतात.

- विलास पुंडकर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT