Horticulture Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Horticulture Production : देशातील फलोत्पादन उत्पादनात ०.६५ टक्के घट

Fruit Production India : गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

New Delhi News : देशातील २०२३-२४ यावर्षासाठीचे फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनापर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे.

मात्र, एकूण उत्पादनात घट झाली असली, तरी फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती यासारख्या प्रमुख बागायती क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२३-२४ या हंगामाकरिताचा विविध फलोत्पादन पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. याकरिता राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोतांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. देशभरातील फळे, भाजीपाला आणि लागवडीखालील पीक उत्पादनाचा साधारण कल या माहितीतून समोर येतो.

फळ उत्पादनात २.२९ टक्के वाढ

२०२३-२४ यावर्षी देशातील एकूण फळ उत्पादनात २.२९ टक्के वाढ अपेक्षित आहे. याविशेषत: आंबा, केळी, लिंबू, द्राक्ष, सीताफळ यासारख्या पिकांचे उत्पादनात वाढ, तर सफरचंद, संत्रा, मोसंबी, पेरू, लिची, डाळिंब, अननस यांच्यात घटीचा अंदाज आहे. एकत्रितरीत्या एकूण ११२.७३ दशलक्ष टन फळ उत्पादन अंदाज आहे.

भाजीपाला उत्पादन

२०२३-२४ या वर्षात एकूण भाजीपाला पिकांचे २०५.८० दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, साबुदाणा (कंद) भोपळा, डांगर, काकडी, कारले, पडवळ आणि भेंडी या पिकांमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. तर, दुसरीकडे, बटाटा, कांदा, वांगी, मोठे रताळे आणि शिमला मिरची यांसारख्या प्रमुख पिकांत काही अंशी घट होण्याची शक्यता आहे. एकूण भाजीपाला उत्पादनात समतोल कल आहे. तसेच, मध, फुले, मसाले, लागवडीखालील पिके, सुगंधी आणि औषधी पिके यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे या अंदाजात म्हटले आहे.

देशातील फलोत्पादन पीक क्षेत्र...

१) २०२३-२४ : २८.९८ दशलक्ष हेक्टर (तिसरा अंदाज)

२) २०२३-२४ : २८.६३ दशलक्ष हेक्टर (दुसरा अंदाज)

३) २०२२-२३ : २८.४४ दशलक्ष हेक्टर (अंतिम अंदाज)

देशातील फलोत्पादन पीक उत्पादन...

१) २०२२-२३ : ३५५.४८ दशलक्ष टन

२) २०२३-२४ : ३५३.१९ दशलक्ष टन

प्रमुख पिकांचे अपेक्षित उत्पादन २०२३-२४

कांदा : २४२.४४ लाख टन (-)

बटाटा : ५७०.४९ लाख टन (-)

टोमॅटो : २१३.२० लाख टन (+)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon: मॉन्सूनने आगेकूच सुरूच; पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा

Cotton Fertilizer: जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?

Farmer Group Competition: ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेत ७६८ शेतकरी गट सहभागी

Shaktipeeth Highway Protest: ''पैसा नको, शेती पाहिजे, मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?''; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, हजारो शेतकरी एकवटले

Agriculture Advisory: बीजप्रक्रिया करून पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी : कुलदीप देशमुख

SCROLL FOR NEXT