health benefits of Lindi Pippar  
महिला

अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर 

नवजात बाळाला गुटी देण्याची परंपरा आजही आहे. त्यातील औषधी घटकांत पिंपळी असतेच. पिंपळी पावडर विशेषतः कफनाशक म्हणून उत्तम काम करते.

डॉ. विनीता कुलकर्णी

आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच माहिती असणार. नवजात बाळाला गुटी देण्याची परंपरा आजही आहे. त्यातील औषधी घटकांत पिंपळी असतेच. कोणत्याही आयुर्वेदिक काष्ठौषधीच्या किंवा मेडिकल दुकानामध्ये मध्ये पिंपळी पावडर सहज उपलब्ध होते. पिंपळी पावडर विशेषतः कफनाशक म्हणून उत्तम काम करते. 

  • अचानक झालेला हवाबदल, थंड पाणी आणि दह्याचे सेवन केल्याने सर्दी होते. अशावेळी पिंपळी पावडरचे मधासह चाटण करून २ ते ३ वेळा सेवन करावे. 
  • खोकल्याची ढास लागत असल्यास, सितोपलादी चूर्ण अर्धा चमचा आणि पिंपळी चूर्ण १/४ चमचा एकत्र करून तुपासह चाटण घ्यावे. मध जास्त आणि तूप कमी प्रमाणात घ्यावे.
  • अजीर्ण अपचनाने पोटात अस्वस्थता जाणवते. अशावेळी पिंपळी १/४ चमचा आणि सैंध्य घालून जेवणामध्ये ताक प्यावे. ताक गोड आणि ताजे असावे. त्यामुळे पचन सुधारून भूक चांगली लागते. थंड ताकाचे सेवन करणे टाळावे.
  • काही वेळा दिवसभर कोरडा खोकला सतत येतो. ठसका आल्याप्रमाणे खोकला येतो. त्यावेळी पिंपळी पावडर १/४ चमचा, ज्येष्ठमध पावडर १/४ चमचा आणि १/२ चमचा सितोपलादी चूर्ण मधासह किंवा गरम पाण्यासह घेतल्यास आराम मिळतो.
  • दमा, उचकी लागणे, कफ पडणे या लक्षणांसाठी पिंपळी चूर्ण मधासह ४ ते ५ वेळा चाटण स्वरूपात घ्यावे.
  • पिंपळी भूक वाढवणारी, पचनशक्ती सुधारणारी असल्याने त्यापासून तयार केलेले पिप्पल्या सव औषध पचनशक्तीवर उत्तम काम करते. फक्त त्याची मात्रा तज्ज्ञांना विचारून ठरवावी.
  • पिंपळीचा उपयोग जास्त काळापर्यंत केल्यास पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याचे  सेवन रुग्णाची प्रकृती पाहून ठरवणे आवश्‍यक असते.
  • पथ्य 

  • पिंपळी कफावर कार्य करणारी असल्याने औषध चालू असताना थंड पाणी, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा, लस्सी हे पदार्थ खाणे टाळावे.
  • अवेळी जेवण, बाहेरचे जड पदार्थ, चमचमीत आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.  
  • काळजी 

  • कफ जास्त झाला असेल, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • भूक न लागणे, पोटात दुखणे, उलट्या या तक्रारी वारंवार होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या जरूर कराव्यात.
  • संपर्क डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

    Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

    ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

    Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

    Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

    SCROLL FOR NEXT