Soybean fungal diseases Agrowon
कृषी सल्ला

Soybean Diseases : सोयाबीनला या रोगांचा धोका ?

काही ठिकाणी सोयाबीन पिकावर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

सोयाबीन पीक (Soybean Crop) सध्या शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत. काही ठिकाणी सोयाबीन पिकावर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा (Fungal Diseases) प्रादुर्भाव दिसून येत आहे. याशिवाय मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, येणाऱ्या काळात शेंग करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

रोगाची लक्षणे काय आहेत ?

रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. प्रादुर्भाव झालेला भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे.

व्यवस्थापन कसे कराल?

पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंग करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी

पूर्वमिश्रित बुरशीनाशक टेब्युकोनॅझोल (१० %) + सल्फर (६५ %) ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा

टेब्युकोनॅझोल (२५.९ %) २५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन (२० %) १५० ते २०० ग्रॅम किंवा

पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ % + इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) ३०० मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे.

सध्या काही ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे. सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे. कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारशीनूसारच वापरावे. कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT