Soybean Yellow Mosaic Agrowon
कृषी सल्ला

Soybean Yellow Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझाईकचे सोप्या पद्धतीने व्यवस्थापन

Whitefly Management: या रोगाला पिवळा रोग असेही म्हणतात. या विषाणूजन्य रोगामुळे पीक पिवळे पडते. हा रोग प्रामुख्याने पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनंतर दिसतो. पिवळा मोझाईक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. त्यामुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Swarali Pawar

थोडक्यात माहिती:

१. पिवळा मोझाईक हा विषाणूजन्य रोग सोयाबीनच्या उत्पादनात ९०% पर्यंत घट करू शकतो.

२. हा रोग प्रामुख्याने पांढऱ्या माशीमुळे पसरतो, ज्याचे नियंत्रण महत्त्वाचे आहे.

३. लक्षणांमध्ये पाने पिवळी पडणे, झाडाची वाढ खुंटणे, आणि शेंगांची संख्या कमी होणे यांचा समावेश होतो.

४. वेळेवर पेरणी, रोगप्रतिकारक वाण, व पांढरी माशी नियंत्रणाने नुकसान टाळता येते.

५. जैविक, यांत्रिक आणि रासायनिक उपायांनी एकात्मिक व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरते.

Soybean Yellow Disease: या हंगामात पावसाने सध्या उघडीप दिली आहे. या काळात पिकांवर विविध प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसत आहे. या रोगाला पिवळा रोग असेही म्हणतात. या विषाणूजन्य रोगामुळे पीक पिवळे पडते. हा रोग प्रामुख्याने पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनंतर दिसतो.

पिवळा मोझाईकची लक्षणे

या रोगामध्ये पिकातील पाने पिवळी पडायला लागतात. सोयाबीनची वाढ खुंटते, पाने अरुंद होतात, रोग झालेली पाने सुरकतून जातात. 

मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडून जाते. अशा झाडांना फुले कमी लागतात.

शेंगांचा आकार लहान राहतो, सोयाबीन शेंगांची संख्या कमी होते, शेंगांमध्ये दाणे कमी भरून दाण्यांमधील तेलाचे प्रमाण कमी होते, परिणामी उत्पादन घटते. 

नुकसानीचा प्रकार

पिवळा मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याअगोदरच झाला तर उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट येते. एकंदर पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान मोठ्या प्रमाणात होते. परंतु ७५ दिवसांनंतर रोगाचा प्रसार झाला तर फारसे नुकसान होत नाही. एकंदरीत उत्पादनामध्येच घट येते.

पिवळा मोझाईकचे व्यवस्थापन

पिवळा मोझाईक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पांढरी माशी व अन्य रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पारंपरिक उपाय

या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रोग प्रतिबंधात्मक वाणांची लागवड करावी, जसे की जे. एस. ९७-५२.

योग्यवेळी पेरणी न केल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सोयाबीनची पेरणी जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान करावी.

पांढऱ्या माशीच्या वाढीसाठी पूरक अशा शेतामधील आणि बांधावरील तण-वनस्पती काढून टाकाव्यात. त्यामुळे वाहकांची संख्या कमी राहून विषाणूंचा प्रसार कमी राहतो.

प्रादुर्भाव झालेली पिके शोधून त्वरित उपटून टाकावीत. कारण त्यातूनच अन्य झाडांवरही प्रसार होण्याची शक्यता असते.

यांत्रिक उपाय

पिवळे चिकट सापळे हेक्टरी २२ ते २३ याप्रमाणे लावावेत. 

जैविक उपाय

पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्काची (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक उपाय

नत्राचा वापर अधिक असल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकांना शिफारशीप्रमाणे खते द्यावी.

पांढरी माशी या रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी ऍसीटामीप्रिड प्रति पंप साठी १०-१५ ग्रॅम वापरावे किंवा बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९%) + इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) हे संयुक्त कीडनाशक ०.७ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे. किंवा थायामेथोक्झाम + लॅंबडा सायलोथ्रीन हे संयुक्त कीडनाशक ०.२५ मि.ली. प्रती लिटर किंवा क्लोरॲन्ट्रनिलीप्रोल (९.३० टक्के) + लॅंबडा सायलोथ्रीन (४.६० टक्के) हे संयुक्त कीडनाशक ०.४ मिलि प्रती लिटर पाणी यापैकी एका आंतरप्रवाही संयुक्त कीडनाशकांची फवारणी करावी. 

वारंवार विचारलेले प्रश्न:

१. पिवळा मोझाईक रोग कधी दिसतो?
साधारणपणे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी लक्षणे दिसतात.

२. सोयाबीनवरील पिवळा मोझाईक रोग कशामुळे पसरतो?
पांढरी माशी या रस शोषक कीडीमुळे हा रोग पसरतो.

३. या रोगाचे लक्षणे कोणती?
पानांची पिवळसरता, वाढ खुंटणे, आणि शेंगांचा आकार लहान होणे.

४. पिवळ्या मोझाईकवर जैविक उपाय कोणते आहेत?
निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन यांची फवारणी उपयुक्त ठरते.

५. या रोगाचे नुकसान किती होऊ शकते?
फुलोऱ्यापूर्वी प्रादुर्भाव झाल्यास ९०% पर्यंत उत्पादन घटते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT