Kolhapur News: कोथळी (ता.शिरोळ) येथे जनावरांना लाळ्या खुरकूत साथीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पसरला आहे. अशातच या आजाराने गाभण गाय मृत्युमुखी पडल्याने कोथळीतील पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पशुधन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पशुपालकातून संताप व्यक्त होत आहे..राज्य शासनाच्या पशुधन विभागामार्फत दरवर्षी करण्यात येणारे लाळ्या खुरकूत व विविध विषाणूजन्य आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण यंदा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करण्यात आली नाही. सध्या कोथळीत लाळ्या खुरकूत आजाराचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली..Livestock Health: अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होतात आजार.गेल्या १५-२० दिवसांपासून या संसर्गजन्य आजारामुळे पशुधन धोक्यात आले असून दरम्यान, कोथळी येथील शिवसेना (ठाकरे गट) गटाचे विभाग प्रमुख सुकुमार नेजकर यांनी शासनाने त्वरित आरोग्य यंत्रणा सक्रिय करून पशुधन वाचवण्यासाठी २४ तास सेवा उपलब्ध करावी..Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात .गोठा टू गोठा सर्वेक्षण करून उपचार सुरू करावेत व योग्य मार्गदर्शन करावे, अन्यथा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. कोथळीत लाळ्या खुरकूत आजाराचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे..कोथळी येथे काही जनावरांना लाळ्या खुरकूत आजार झाला आहे. त्यामुळे सर्व्हे सुरू केला आहे. तसेच संबंधित दूध संस्थांमार्फत पशुपालकांना जनावरांत लक्षणे दिसताच शासनाच्या पशू वैद्यकीय विभागाला बोलावून उपचार करून घ्यावेत.-डॉ. जितेंद्र कुरुंदवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी, कोथळी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.