Soybean Pest Control: सोयाबीन पिकावरील हुमणी अळीचं व्यवस्थापन कसं करावं?

humni ali: सध्या सोयाबीन पीक शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे. या टप्प्यावर सुरुवातीच्या काळातील हुमणी अळीचे नियंत्रण न केल्यास पिकाचे ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

soybean crop protection: हुमणी ही एक बहुभक्षीय आणि धोकादायक कीड असून, सतत बदलणारे हवामान आणि उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे तिचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांपासून वाढताना दिसतो आहे. महाराष्ट्रात सोयाबीनसोबतच कापूस, भुईमूग, ऊस, आले आणि हळद अशा पिकांवरही या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. सामान्यतः मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाच्या आगमनानंतर जमिनीत सुप्तावस्थेत असलेले हुमणीचे प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. यंदा पावसाचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाल्यामुळे सोयाबीनची पेरणी देखील लवकर झाली. परिणामी हुमणीच्या प्रजनन प्रक्रियेलाही वेग आला असून, भुंगेरे जमिनीत लवकर अंडी घालू लागले आहेत. त्यामुळे यावर्षी हुमणी अळीचा प्रादुर्भाव लवकर आल्याचे स्पष्ट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com