भात, सोयाबीन पिके बहरली
भात, सोयाबीन पिके बहरली Agrowon
कृषी सल्ला

Crop Advisory : अवस्थेनूसार भात, सोयाबीन, तूर पिकातील व्यवस्थापन

Team Agrowon

हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात १ ऑक्टोबर पर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी केलेल्या खरीप पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. याशिवाय भात, (Paddy) सोयाबीन (Soybean) आणि तूर (Tur) पिकात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजना कराव्यात . 

भात 

भात पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. भात पिकात झिंक ची कमतरता आढळून आल्यास अशा ठिकाणी ०.२ % झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यातून द्यावे. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे फुलोरा अवस्थेत आहे तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. ढगाळ व दमट हवामानामुळे भात पिकावर कडा करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.  नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात स्टिकर ०.१ % मिसळून फवारणी करावी. भात पिकात पाने गुंडाळणाऱ्या आळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर म्हणजेच दोन प्रादुर्भावग्रस्त पाने प्रती चूड अढळून आल्यास शिफारशीनूसार फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी,  खोडकिड आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅसिफेट (७५ टक्के एस पी) ६०० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. 

सोयाबीन 

सोयाबीन पिकामध्ये सध्या शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ८ ते १० पक्षीथांबे उभारावेत. पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५ स्पोडोल्यूर चा वापर करून फेरोमन सापळे लावावेत. नियंत्रणासाठी अंडी समूहांचा तसेच समूहाने आढळणाऱ्या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक कीडनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस (२० %) २० मिली किंवा सायपरमेथ्रीन (२५ %) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. आर्द्रता युक्त वातावरणामुळे तांबेरा या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 

तूर 

तूर पिकामध्ये सध्या फांद्या फुटण्याची अवस्था आहे. किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आवश्यकतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्याची पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही.

ऊस 

ऊस पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उसामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोप्ली  परोपजीवी बुरशी २० किलो प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे किंवा २.५ ते ३ किलो हेक्टरी फवारणीसाठी वापरावे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT