How do you manage rice and sugarcane crops?  Agrowon
कृषी सल्ला

Crop Advisory : भात, ऊस पिकातील व्यवस्थापन कसे कराल?

भात पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे.

Team Agrowon

हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात दिनांक २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण (Rain) सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याने फवारणी पुढे ढकलावी किंवा पावसाचा अंदाज बघून पिकावर कीडनाशकाची फवारणी करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने भात (Rice) आणि ऊस (Sugarcane) पिकातील व्यवस्थापनाविषयी पुढील सल्ला दिला आहे.

भात पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. भात पिकात झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास ०.२ %  झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यातून द्यावे. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे फुलोरा अवस्थेत आहेत तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. ढगाळ व दमट हवामानामुळे भात पिकावर कडा करपा, पर्ण करपा व तपकिरी ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. द्रावणात स्टिकर ०.१ % मिसळून फवारणी करावी. भात पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानंतर शिफारशीत फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी, खोडकिड आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅसिफेट (७५ टक्के एस. पी.) ६०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी पाहून फवारणी करावी. 

ऊस पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून उसामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटॅरिझीयम अॅनिसोप्ली परोपजीवी बुरशी २० किलो प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावी किंवा २.५ ते ३ किलो हेक्टरी फवारणीसाठी वापरावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam: ‘उजनी’तून गुरूवारपासून शेतीसाठी पाणी मिळणार

Onion Farmer Issue: शेतकऱ्यांची ‘एनसीसीएफ’वर धडक

Contract Workers Issue: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात

Farmer Scientist Interaction: बन्नाळीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतूकदारांकडून नियमांना तिलांजली

SCROLL FOR NEXT