Crop Advisory Agrowon
कृषी सल्ला

Crop Advisory : फळे, भाजीपाला, रेशीम शेती व्यवस्थापन सल्ला

भाजीपाला आणि रेशीम शेतीतील व्यवस्थापनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील सल्ल्याची शिफारस केली आहे.

Team Agrowon

हवामान अंदाजानूसार मराठवाड्यात दिनांक २ ते ८ नोव्हेंबर दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे. हवामानानूसार फळे, भाजीपाला आणि रेशीम शेतीतील व्यवस्थापनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील सल्ल्याची शिफारस केली आहे. 

- संत्रा, मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मृग बहार घेतलेल्या संत्रा, मोसंबी बागेत पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास फवारणी न केलेल्या बागेत चिलेटेड झिंक ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. 

- डाळिंब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन फुटवे काढावेत. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

- पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या टोमॅटो, कांदा, कोबी भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी. गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. 

- मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड (२० % एस.पी.) १०० ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ % एस. जी.) २०० ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

रेशीम शेती सल्ला

रेशीम किटक थंड रक्ताचा किटक असून संगोपनगृहातील तापमान २० अंश सेल्सिअस च्या खाली व ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेले असता तुती पाने खात नाहीत. ढगाळ वातावरणात संगोपनगृहात तापमापी व ईलेक्ट्रॉनिक आर्द्रता यंत्र असणे गरजेचे आहे. तापमान व आर्द्रतेचा अंदाज न आल्यामूळे रेशीम किटकांमध्ये खडू, ग्रासरी किंवा फ्रॅचरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. दोन कोषाच्या पिकात ८ दिवसाचे अंतर ठेवावे. या काळात ब्लिचिंग पावडर २ टक्के व कळीचा चुना ०.३ टक्के या प्रमाणे १०० लिटर पाण्यात २०० ग्रॅम ब्लिचिंग पावडर व ३०० ग्रॅम चुना वापरावा. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT