मक्यावरील लष्करी अळीचे (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा)एकात्मिक नियंत्रण
महाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही अळी मका, ऊस आदी मुख्य पिकांवर गंभीर रूप धारण करीत आहे. मागील वर्षी पाण्याची कमतरता तसेच वाढता प्रादुर्भाव यामुळे मक्याच्या दरात कायम तेजी पाहावयास मिळाली. येत्या खरीप हंगामातही वेळीच सावध होऊन एकात्मिक कीडनियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे. फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) अर्थात स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. जून २०१८ मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव आढळला. खरीप व रब्बी हंगामात तसेच मका, ऊस तसेच ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या किडीमुळे होत आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाई तसेच वाढता प्रादुर्भाव यामुळे मक्याच्या दरात कायम तेजी जाणवत आहे. किडीची संपूर्ण ओळख करून येत्या खरिपातही वेळीच जागरूक असणे गरजेचे आहे. किडीची ओळख
जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमधून.मादी पानाच्या वरच्या व खालील बाजूस, पोंग्यामध्ये जवळपास एक हजार अंडी घालते. पुंजक्यामध्ये असलेल्या अंड्यांवर लोकरीसारखे आवरण.अंड्यांचा रंग पिवळट सोनेरी. घुमटाच्या आकाराची.अंडी अवस्था २ ते ३ दिवसांचीही अवस्था सहा अवस्थांमधून पूर्ण होते.अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या अन्नाच्या शोधात विखुरतात.प्रथम अवस्थेतील लहान अळ्या हिरव्या. डोके काळ्या रंगाचे.दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर डोके तपकिरी. तिसऱ्या अवस्थेमध्ये रंग तपकिरीअंगावर वरच्या बाजूने तीन पांढऱ्या रेषा.चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्यासारखे ठिपकेअळी अवस्था १४ ते १९ दिवसांमध्ये पूर्णपूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर जमिनीत जाऊन मातीचे ‘वेस्टन’ करून कोषावस्थेत.कोष लालसर तपकिरी.कोषावस्था ९ ते १२ दिवसांत पूर्णनर पतंग राखाडी ते तपकिरी. पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका व पंखाच्या मध्यभागी गोल ठिपकामादी पतंगाचे पुढचे पंख राखाडी.नर आणि मादीमध्ये मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे.पतंग अवस्था चार ते सहा दिवसांची.लष्करी अळीचा जीवनक्रम ३२ ते ४६ दिवसांत पूर्णडोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूणशरीराच्या आठव्या ‘बॉडी सेगमेंट’ वर चौकोनी आकारात चार ठिपके. त्यात केसही आढळतात.शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नाही. नियंत्रणाबाबत महत्त्वाचे अळीचे पुढील दोन लक्षणावर आधारित व्यवस्थापन करावे १. पिकावर वाढणारी लक्षणे अळीची वाढ दर्शवतात. २. अळीची वाढीची अवस्था कोणते कीटकनाशक निवडावे अथवा नियंत्रणाचे उपाय योजावेत हे ठरवते. नुकसानीचा प्रकार
मका पिकात रोपावस्थेत पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे.लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव आहे असे समजावे व नियंत्रणाचे उपाय योजावेत.अळी तिसऱ्या अवस्थेत पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरवात करते. या अवस्थेत पानांवर छिद्रे दिसतात.पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे.सहाव्या अवस्थेत अळी आधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. या अवस्थेत मक्याची पाने झडल्यासारखी दिसतात.तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत आर्थिक नुकसान अधिक. अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. मधुमका जास्त प्रमाणात बळी पडतो. शेतात निरीक्षण कसे करावे?
शेताचे दरोज निरीक्षण करावे. बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू (W) आकारात चालावे. या आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी एकूण वीस झाडे निवडावीत. पैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी.वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भावित असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजणे गरजेचे आहे. आर्थिक नुकसान संकेत पातळी १. रोपावस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था (उगवणी नंतर दोन आठवड्यांपर्यंत)-तीन पतंग प्रति सापळा किंवा ५ टक्के प्रादुर्भावित झाडे २-सुरवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था (उगवणीनंतर दोन ते चार आठवडे) :- ५ ते १० टक्के प्रादुर्भावित झाडे ३. मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर ४ ते ७ आठवडे):- १० ते २० टक्के प्रादुर्भावित झाडे ४. उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर सात आठवड्यांपुढे)- २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावित झाडे ५. तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी : १० टक्क्यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान एकात्मिक नियंत्रण
पाऊस पडण्याआधी खोल नांगरट. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.फेरपालट. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. उदा. मका+ तूर, उडीद, मूगमक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. त्याचा उपयोग सापळा पीक म्हणून होतोमका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षिथांबे उभारावेत.पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.किडीच्या सर्वेक्षणासाठी पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ कामगंध सापळे लावावेत.पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.मधु मका किंवा बेबी कॉर्नमध्ये १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन पाच मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी.प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी. कीटकनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी थायोमिथोक्झाम १२.६ अधिक ५ मिलि लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी स्पिनेटोरम (११. ७ एससी) ४ मिलि क्लोरऑट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ४ मिलि प्रमाण- नॅपसॅक पंपासाठी डॉ. अंकुश चोरमुले- ९७३००००६२३, ८२७५३९१७३१ (लेखक सिस्क्थ ग्रेन या कंपनीत ॲग्रॉनॉमिस्ट आहेत.