दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत अन्नद्रव्यांचा समतोल राखणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे उत्पादित द्राक्षाचा दर्जा घसरतो. याकरिता अन्नद्रव्यांची कमतरता व अधिकता यांची पाने, काडी व मण्यावरील लक्षणे ओळखून वेळीच योग्य उपाययोजना अवलंब करणे आवश्यक असते. कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची एकत्रित कमतरता कॅल्शिअम हे द्राक्ष वेलीला नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनंतर जास्त प्रमाणात लागणारे मूलद्रव्य आहे. विशेषतः फुलोऱ्यात येण्याआधी दहा ते बारा दिवसांपासून तर मण्यात पाणी शिरेपर्यंत कॅल्शिअमची गरज असते. मणी धरताना व मण्याची वाढ होताना (दोन ते सहा मि.मी.पर्यंत) कॅल्शिअमची जास्त गरज असते. कॅल्शिअम कमतरतेचे परिणाम कॅल्शिअम कमतरतेमुळे पानांच्या मुख्य शिरा पिवळसर होतात. मणी धरताना मणीगळ होते, मण्यात गराचे प्रमाण कमी राहते, मण्यांचा टिकाऊपणा कमी होतो, तयार होत असलेल्या मण्यांना तडे जातात. उपाययोजना
फेरस कमतरता
उपाययोजना फेरस कमतरता त्वरित भरून काढण्याकरिता चिलेटेड फेरस अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन ते चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जमिनीतून फेरस सल्फेट एकरी २० किलो शेणाच्या रबडीत मिश्रण करून द्यावे.
झिंक कमतरता
उपाययोजना झिंकची कमतरता त्वरित भरून काढण्यासाठी चिलेटेड झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन ते तीन दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जमिनीत झिंक सल्फेट एकरी ७ किलो या प्रमाणे सात ते दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा (एकूण २० किलो) द्यावे. झिंक, फेरस व मॅग्नेशिअमची एकत्रित कमतरता
परिणाम झिंक, फेरस कमतरतेचे परिणाम आपण आधीही पाहिले आहेत. मॅग्नेशिअम हा क्लोरोफिल निर्मितीमधील मुख्य घटक असून, त्याच्या कमतरतेमुळे क्लोरोफिलची निर्मिती कमी होते. मण्यांची फुगवण कमी होते. उत्पादनात मोठी घट येते. उपाययोजना झिंक व फेरस संबंधी वर सुचविल्या प्रमाणे उपाययोजना कराव्यात. मॅग्नेशिअम कमतरता भरून काढण्यास मॅग्नेशिअम सल्फेट अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांचे अंतराने तीन वेळा फवारणी करावी. एकरी पंधरा किलो मॅग्नेशिअम सल्फेट दर सात दिवसांनी असे तीन वेळा द्यावे. - वासुदेव चि. काठे, ९९२२७१९१७१ अशोक ना. पाटील, ९७६५२१९७९५ (दाभोलकर प्रयोग परिवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.