Infestation larvae on leaves.
पावसाळी हंगामात हळद, आले फुटव्यांची वाढ भरपूर होते. वातावरणातील आर्द्रता तसेच ढगाळ हवामान, कमी तापमान या सर्व बाबींमुळे विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन नियंत्रणाची उपाययोजना करावी. कीड व्यवस्थापन कंदमाशी कंदमाशीची अळी उपजीविकेसाठी कंदामध्ये प्रवेश करते. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तेथे रोगकारक बुरशी तसेच सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होऊन कंद मऊ होतात. परिणामी कंदांना पाणी सुटून ते कुजू लागतात. नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलि किंवाडायमेथोएट (३०% प्रवाही) १ मिलि १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.वेळेवर भरणी करावी. जैविक नियंत्रण प्लॅस्टिकची भांडी घेऊन त्यामध्ये भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम आणि १.५ लिटर पाणी मिसळून आमिष तयार करावे. या आमिषातून ८ ते १० दिवसांनी विशिष्ट वास येऊन त्याकडे कंदमाशा आकर्षित होऊन मरतात. ही उपाययोजना अत्यंत सोपी, प्रभावी आणि कमी खर्चिक आहे. खोडकिडा
अळी पानांच्या कडेचे हरीतद्रव्य खाते. तसेच खोड व कंद पोखरते.खोडाला छिद्र करुन अळी आतील भाग खाते. खोडावर पडलेले छिद्र हे खोडामध्ये अळी जिवंत असल्याचे लक्षण होय.मध्यभागातील पान पिवळे पडलेले दिसते. कालांतराने खोड वाळायला सुरुवात होते.एकरी एक प्रकाश सापळा लावावा.क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलिः प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावेअळी पाने गुंडाळून पानाच्या आतमध्ये राहून पाने खाते.पूर्ण वाढलेली अळी पानाच्या गुंडाळीमध्येच कोषावस्थेत जाते.पानांवरील अळ्या व कोष गोळा करून नष्ट करावेत.अळीने गुंडाळलेली पाने खोडून अळीसह नष्ट करावीत.क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलि.जमिनीत मुळांभोवती राहून मुळातील रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फुटव्यांचे प्रमाण कमी होते.सुरवातीला शेंडा मलून होतो. पीक पिवळे पडून झाड मरते.कालांतराने कीड कंदामध्ये प्रवेश करून कंद सडविते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात.किडीने केलेल्या जखमांतून रोगकारक बुरशी कंदात शिरते. त्यामुळे कंदकूज होते.ट्रायकोडर्मा प्लस पावडर (जैविक बुरशीनाशक) २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी. किंवाभरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी.झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी.नवीन वाढ होत असलेल्या कंदावर आणि मुळांवर प्रादुर्भाव दिसून येतो.अळ्या सुरवातीच्या काळात सेंद्रिय पदार्थ (शेणखत) वर उपजीविका करतात. नंतर मुळे कुरडतात. त्यामुळे पीक पिवळे पडून वाळते.जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कंदही कुरडतात. प्रादुर्भाव झालेल्या शेतातील पीक सहज उपटून येते.सामूहिकपणे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते.संध्याकाळच्या वेळी किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.मेटॅरायझियम ॲनसोप्ली (परोपजीवी बुरशी) हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी. अर्धवट कुजलेले शेणखत वापरू नये.क्लोरपायरिफॉस ४ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.पाने सुरळी किंवा पोंगा अवस्थेत असताना अळी पानावर उपजीविका करते. अळी पाने खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते.सुरळीतील पान पूर्णपणे उघडल्यानंतर त्यावर सरळ रेषेमध्ये छिद्रे आढळून येतात. नियंत्रण (फवारणी : प्रति लिटर पाणी)
गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत.डायमिथोएट (३०% प्रवाही) १ मिलि किंवाक्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिलि. रोग नियंत्रण कंदकूज (गड्डाकूज)
कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर प्रादुर्भाव दिसतो.सुरळीतील पानांचे शेंडे वरील बाजूने आणि कडेने पिवळे पडून १ ते १.५ सें.मी. खालीपर्यंत वाळतात. संपूर्ण पान वाळते.खोडाचा गड्ड्या लगतच्या बुंध्याचा रंग तपकिरी काळपट होतो. गड्डाही वरून काळा व निस्तेज झालेला दिसतो.प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो, त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडते.रोगामध्ये सर्वप्रथम झाडाची सुरळी मरते.प्रादुर्भावीत कंद, गड्डे जाळून नष्ट करावेत.भरणी, खुरपणी करताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम किंवामॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम किंवाकॉपर ऑक्झिक्लोराईड (५० डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम.तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्झिल-एम (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवाहेक्झाकोनॅझोल (५ ई. सी.) ०.५ ते १ मिलि यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडानजीक आळवणी करावी.( सुचना : आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. फवारणी करताना द्रावणात चिकट पदार्थ (स्टिकर) १ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारावे.) पानांवरील ठिपके (करपा/लीफस्पॉट)
पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. जास्त तीव्रतेमध्ये ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. पान तांबूस राखी-तपकिरी रंगाचे दिसते, पान गळून पडते. नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवाकार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवाकॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅमतीव्रता वाढल्यास, १ टक्का बोर्डो मिश्रण फवारणी किंवाप्रॉपीकोनॅझोल (२५ ई. सी.) ०.५ ते १.० मिलि किंवाक्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम. ( टीप : जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्याचे होईपर्यंत बुरशीनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी. एकच बुरशीनाशक सतत वापरू नये.) पानांवरील ठिपके (लीफ ब्लॉच)
जमिनीलगतच्या पानांवर रोगाची सुरवात होऊन वरील पानांवर पसरतो.पानांवर वरच्या पृष्ठभागावार असंख्य लहान गोलाकार दाण्यासारखे ठिपके तयार होतात. ठिपक्याच्या मध्यभागी बुरशीची काळी फळे असतात. सुरुवातीला ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा नसते. परंतु कालांतराने ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा तयार होते. पान तांबूस रंगाचे होऊन वाळून जाते.पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडाकृती किंवा गोलाकार काळ्या रंगाचे खोलगट ठिपके तयार होतात. ठिपक्याचा मुख्य भाग पांढरा आणि ते २ ते ४ मि.मी. आकाराचे असतात. ठिपक्याच्या पांढऱ्या भागावर बुरशीची काळी फळे पसरलेली असतात. कालांतराने पानांच्या वरच्या पृष्ठभागावर खड्यांच्या आकाराचे तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ मे २ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात.हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसू लागतात. हे ठिपके फुलांवर सद्धा आढळतात. नियंत्रण (फवारणी : प्रति लिटर पाणी)
मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवाकार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवाकॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम तीव्रता जास्त झाल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवाप्रॉपीकोनॅझोल (२५ ई.सी.) ०.५ ते १.० मिलि किंवाक्लोरथॅलोनील(७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅमरोगग्रस्त पाने व फुले गोळा करून नष्ट करावीत. - डॉ. मनोज माळी, (प्रभारी अधिकारी) ९४०३७ ७३६१४ -डॉ. सचिन महाजन, (वनस्पती रोगशास्रज्ञ) ९४२११ २८३३३ (हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)