बीटी कपाशी ही अन्य कपाशी जातींच्या तुलनेमध्ये अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रमाणात करते. हे लक्षात ठेवून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. बीटी कपाशीमध्ये सुरुवातीला पात्यांचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाते व बोंडे गळण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामागील कारणांचा शोध घेऊन ती कमी केल्यास उत्पादनात वाढ शक्य होते. कपाशी झाडावरील उत्पादनाच्या प्रमाणात पिकांची अन्नद्रव्याची वाढती गरजही पूर्ण करणे आवश्यक आहे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये माती परीक्षण, सेंद्रिय खते, जिवाणू खते, रासायनिक खते (जमिनीतून द्यावयाची) आणि फवारणीद्वारे द्यावयाची खते यांचा एकत्रित आणि संतुलित वापर केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता टिकून राहण्यासोबतच उत्पादन व गुणवत्ताही चांगली मिळू शकते. सेंद्रिय खते जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांची गरज असते. जमिनीत अन्नद्रव्यांची साठवणूक, वाहतूक, पांढऱ्या मुळांची वाढ आणि उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरणनिर्मिती यासाठी सेंद्रिय खतांचा अंतर्भाव अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा आहे. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खतांचा वापर करावा. कोरडवाहू कपाशीसाठी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळ खत उपलब्ध असल्यास ०.५ टन तर बागायती कपाशीसाठी एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत व गांडूळ खत १ टन वापरावे. सेंद्रिय खतांचा वापर मशागतीच्या वेळी करावा. जिवाणू खते जैविक खतांचा वापर अन्य खतांइतकाच महत्त्वाचा आहे. कपाशीसाठी ॲझेटोबॅक्टर व पीएसबी ही जिवाणू खते वापरावीत. ॲझेटोबॅक्टर जिवाणू वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळवणारे जिवाणू जमिनीत स्थिर झालेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. जिवाणू खतांचा वापर पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेतून करावा. (बीजप्रक्रिया प्रमाण - प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे). अशी बीजप्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही, त्यांनी लागवडीनंतर एक महिन्याच्या आत भुकटी स्वरूपातील अॅझेटोबॅक्टर ४ किलो व पीएसबी ४ किलो या प्रमाणात शेणखत किंवा गांडूळ खत किंवा शेण गोमूत्र स्लरी यामध्ये मिसळून करावा. रासायनिक खते
दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण बीटी कपाशीला सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो व गंधक ८ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीला वापरावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट १० किलो व बोरॉन २ किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात ८ ते १० दिवस मुरवून वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परीक्षणानुसार निर्णय घ्यावा. विद्राव्य खतांचा वापर अनेक शेतकरी कपाशी सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब करतात. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करता येतो. अशा प्रकारे खते दिल्यास उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ व रासायनिक खतांच्या मात्रेत २० ते २५ टक्के बचत होते. विद्राव्य खते आम्लधर्मी असल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रातील सामू नियंत्रित राहतो. ठिबक सिंचन संचामध्ये क्षार साचून तोट्या (ड्रीपर्स) बंद होत नाहीत. ही खते सर्व झाडांना सारख्या प्रमाणात देणे शक्य होते. विद्राव्य खते देण्याची पद्धत
फवारणीद्वारे खतांचा वापर
महत्त्वाचे रासायनिक खते जमिनीत गाडून किंवा पेरूनच द्यावीत. फेकून देऊ नयेत. नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा अधिक वापर अजिबात करू नये. त्यामुळे केवळ कायिक/ शाखीय वाढ जास्त प्रमाणात होते. झाडास फुले येणे व फलधारणा कमी प्रमाणात होते. नत्राच्या जास्त वापरामुळे झाडांवर किडींचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नेहमी शिफारशीनुसार आणि माती परीक्षणानुसारच करावा. - रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (लेखक कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज येथे आचार्य पदवी घेत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.