Guide the farmers through the farmer producer company study tour.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सन २०२१-२२ यावर्षी विविध राज्यातील आदर्श शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जाणार आहेत. याकरीता प्रामुख्याने छोट्या उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सन २०२१-२२ यावर्षी विविध राज्यातील आदर्श शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जाणार आहेत. याकरीता प्रामुख्याने छोट्या उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य होणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या सदस्यांना आवश्यक निविष्ठा, सुविधांचा पुरवठा करून आर्थिक स्थैर्य देण्यासोबत उत्पादन व विपणन यांचा समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शेतकरी स्वयंसहाय्यता गटांना सुधारीत उत्पादन तंत्रज्ञान, काढणीपश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, वाहतूक, बाजार व्यवस्थापनेतील बारकावे यांची माहिती उत्पादक कंपनीच्या निर्मितीतून होऊ लागली आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी अभ्यास दौऱ्याला महत्त्व आहे. अभ्यास दौऱ्याचे उद्देश
सदस्यांना इतर राज्यातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती होणे.शेतकरी उत्पादक कंपनी विपणन साखळी निर्माण करणे.प्रयोगशील शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेटी देणे.शेतकरी उत्पादक कंपनी आर्थिक विकास साधने.शेतकरी उत्पादक कंपनी बाजार व्यवस्थापनेतील बारकावे यांची माहिती घेणे.शेतकरी उत्पादक कंपनी - संचालक मंडळ प्रतिनिधी.शेतकरी उत्पादक कंपनी - मुख्य कार्यकारी अधिकारी.वैयक्तिक शेतकरी.कंपनी प्रतिनिधी.कृषी क्षेत्राची आवड असणारी व्यक्ती.पाच दिवस ते एक आठवडा.शेतकऱ्यांच्या आवडीनुसार कालावधी कमी जास्त केला जाऊ शकतो. सहभागी व्यक्तीची संख्या एका अभ्यास दौऱ्यात साधारणतः ३० ते ४० शेतकरी सहभागी होऊ शकतात. शुल्क
सर्व अभ्यास दौरे सशुल्क आहेत. अभ्यास दौऱ्यात शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळ निवडीचे निकष शेतकरी उत्पादक कंपनीने स्वतःच्या पारपत्रावर (पासपोर्ट) असलेल्या नाव आणि पत्त्यासह अर्ज करावा. अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्राधान्य.शेतकरी हा प्रयोगशील असावा. कृषी विभागाच्या विविध कार्यक्रमांत शेतकऱ्यांना प्राधान्याने सहभाग द्यावा.शेतकरी शक्यतो ‘आत्मा’ तसेच इतर कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात येत असलेल्या गटाचा सदस्य असावा. तसेच त्याने गटशेती किंवा समूह शेतीद्वारे आपल्या शेतीचा विकास केलेला असावा.शेतकऱ्याचे वय २१ ते ६२ वर्षे यादरम्यान असावे. त्यासाठी जन्मदाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र सोबत जोडावे.शेतकऱ्यास परदेश अभ्यास दौऱ्यास जाण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव नसावा.शेतकरी उत्पादक कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी ४५ दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे.सहकारी संस्थासाठी व्यवसायाच्या संधी त्यासाठी आर्थिक नियोजन, निधी व्यवस्थापन, नियंत्रण व पत पुरवठा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी, नोंदणी पश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनीच्या विविध समस्या व त्यावर मार्ग कसा काढू शकतो, यावर विविध तज्ञांच्या प्रत्यक्ष शेतकरी उत्पादक कंपनीचा व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यासाठी मदत करणे, त्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, गावपातळीवर अवजार बँक. शेतकऱ्यांना रास्त दरात कृषी निविष्ठा पुरवठा व त्यांना लागणारे बियाणे, गावपातळीवर बियाणे निर्मितीसाठी ग्रामीण बिजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करणे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्यासाठी लागणारी वितरक, परवाने, ओ-फॅार्म महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार आहे.महामंडळामार्फत स्मार्ट, मॅग्नेट, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, राष्ट्रीय कृषी पायाभूत सुविधा धोरण.ग्रामीण कृषी पर्यटन इत्यादी योजनांची माहिती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनींना देणे त्यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन व प्रकल्प अहवाल महामंडळामार्फत इच्छुक संस्थांना तयार करून देण्यात येणार. शेतकऱ्यांना चांगला बाजारभावासाठी “एनसीडीसी ई एक्स” हा चांगला पर्याय आहे. ज्या प्रमाणे शेतकरी पीकविमा घेऊन नुकसानीपासून संरक्षण घेतो, त्याप्रमाणे “पुट ऑप्शन”मध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे. यात शेतकरी उत्पादक कंपनीने “पुट ऑप्शन” घेतल्यानंतर जो प्रीमियम भरावा लागेल तो “एनसीडीसी ई एक्स”देणार आहे.म्हणजे या योजनेत सहभागी होऊन प्रिमीयम न भरता एफपीओ सहभागी करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. संकेतस्थळावर नोंदणी शेतकरी उत्पादक कंपनी व इतर संस्था यांनी वरीलप्रकारे प्रशिक्षण व कार्यशाळा यामध्ये सहभागी व्हावयाचे असेल तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या www. mahamcdc.com या संकेत स्थळावर प्रशिक्षण या विभागास भेट द्यावी. - हेमंत जगताप, ८२७५३७१०८२ (प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी, पुणे)