Intercropping of asparagus in Melia dubia 
 देशात गेल्या दशकापासून मेलिया डुबियाची वनशेतीमध्ये लागवड वाढू लागली आहे. ही एक देशी प्रजाती आहे. याव्यतिरिक्त  पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याबरोबर कर्बाचे स्थिरीकरण, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि एकत्रितरीत्या उत्पादकता वाढविण्याची क्षमता या झाडामध्ये आहे.       मेलिया डुबिया ही  वेगाने वाढणारी, स्थानिक आणि नीम-सदाहरित प्रकारातील प्रजाती आहे. पूर्णपणे वाढलेल्या वृक्षाची उंची सामान्यपणे २० ते २५ मीटर व खोडाचा घेर १२० ते १५० सेंमी असतो. भारतामध्ये मेलिया डुबिया हे मलबार नीम, घोरा नीम, महानीम, लिंबारो, मलाई वेंबू या नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्रामध्ये वनशेती अभियान आणि रोजगार हमी योजने अंतर्गत मेलिया डुबियाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.        हवामान आणि जमीन  
 - संग्राम चव्हाण,   ९८८९०३८८८७   (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, ता. बारामती, जि. पुणे)