Nadep method of compost preparation
नाडेप पद्धतीचा वापर करून उत्तम पद्धतीचे कंपोस्ट खत तयार होते. या पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थ उदा. शेण,टाकाऊ पदार्थ, स्वयंपाक घरातील कचरा इत्यादीचा वापर केला जातो. नाडेप ही कंपोस्ट खत बनविण्याची पद्धती नारायण देवराव पांढरीपांडे ( पुसद,जि. यवतमाळ) यांनी विकसित केली आहे.
नाडेप टाकीची रचना
या पद्धतीमध्ये सर्वप्रथम साधी आयताकृती विटांच्या साहाय्याने पक्की टाकी बांधली जाते.टाकीची आकार १० फूट लांब, ६ फूट रुंद आणि ३ फूट उंच असावा.टाकी बांधत असताना हवेसाठी अधून मधून मोकळी जागा सोडावी. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.या पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थ ९० ते १२० दिवसांमध्ये कुजून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.या पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये ०.५ ते १.५ टक्के नत्र,०.५ ते ०.९ टक्के स्फुरद आणि १.२ ते १.४ टक्के पालाशचे प्रमाण असते. नाडेप कंपोस्ट खत बनविण्यासाठी निरनिराळी प्रमाणके
सेंद्रिय पदार्थ - १४०० ते १५०० किलोशेण व मूत्र - ९५ ते १०० किलोबारीक माती - १००० किलोपाणी - १५०० ते २००० लिटरबांधकाम करत असताना खालचा थर हा सिमेंट वाळूमध्ये बांधावा.टाकी बांधताना प्रत्येकी दोन विटांच्या थरानंतर तिसऱ्या थरामध्ये प्रत्येकी दोन विटानंतर ६ ते ७ इंचाची मोकळी जागा सोडावी. अशा पद्धतीने विटांचे १० थर बांधून घ्यावेत. ३, ६ आणि ९ व्या थराला हवेसाठी मोकळी जागा सोडावी.अशा पद्धतीने ७४ छिद्रे असलेली टाकी बांधून होते.बांधकाम झाल्यानंतर टाकीच्या तळाला विटांचा कठीण थर द्यावा. टाकीच्या भिंती आतून माती आणि शेणाने लिंपून घ्याव्यात. नाडेप कंपोस्ट टाकी भरण्याची पद्धत
नाडेपची टाकी भरत असताना सर्वप्रथम टाकीचा आतला भाग शेण आणि पाणी मिश्रणाने ओला करून घ्यावा.
उपलब्ध असलेले सर्व सेंद्रिय पदार्थाचे बारीक तुकडे करून ६ इंच जाडीचा पहिला थर द्यावा.दुसऱ्या थरामध्ये १५० लिटर पाण्यामध्ये ४ किलो शेण मिसळून शिंपडावे.तिसऱ्या थरामध्ये, शेण आणि मातीचा (२० ते ६० किलो) एकसारखा थर द्यावा, आणि पाण्याने ओलावा करून घ्यावा.टाकी भरण्यासाठी साधारण १० ते १५ थर देऊन १ ते १.५ फूट टाकीच्या वर उंची येईल इतकी भरावी. टाकी भरल्यानंतर माती व शेणाने झाकून घ्यावी.उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नाडेप कंपोस्ट टाकीमध्ये आद्रतेचे प्रमाण ५० ते ६० टक्के रहाण्यासाठी ६ ते ७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.एका टाकीतून ३ ते ४ महिन्याने उत्तम प्रतीचे २.५ ते ३ टन कंपोस्ट तयार होते. कुजलेले तपकिरी रंगाचे व कोणताही कुबट वास नसलेले हे कंपोस्ट खत पिकांसाठी वापरावे.तयार कंपोस्ट खतास चाळणीने चाळावे. चाळल्यानंतर राहिलेला भाग परत नाडेप कंपोस्टींगसाठी टाकीमध्ये वापरावा.उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होते. वरखते, पाणी वापरात बचत होते.जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत बदल होतो.जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो. जमिनीची धूप कमी होते.पिकाची सशक्त वाढ होऊन त्यांच्यात काही प्रमाणात कीड व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.पिकाच्या वाढीसाठी लागणारे नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध होते.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. संपर्क : रोहिणी पाटील, ९८९०५१२७६३
सूरज सलगरे, ८३२९०७९१९४
(शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर,जि.कोल्हापूर)