Archived photographs 
कृषी सल्ला

कृषी कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता

बॅंकांकडून कर्ज घेताना तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प अहवालासोबत विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे कागदपत्रांची मागणी आणि पूर्तता यात बराच वेळ जाऊ शकतो. यात अनेक लोकांचे प्रकल्प अपेक्षित वेळेपेक्षा अधिक रखडू शकतात. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. अनिल महादार

बॅंकांकडून कर्ज घेताना तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प अहवालासोबत विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे कागदपत्रांची मागणी आणि पूर्तता यात बराच वेळ जाऊ शकतो. यात अनेक लोकांचे प्रकल्प अपेक्षित वेळेपेक्षा अधिक रखडू शकतात. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.  बॅंकांकडून कर्ज घेताना तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प अहवालासोबत विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे कागदपत्रांची मागणी आणि पूर्तता यात बराच वेळ जाऊ शकतो. यात अनेक लोकांचे प्रकल्प अपेक्षित वेळेपेक्षा अधिक रखडू शकतात. त्यामुळे बँकेतील अधिकारी विनाकारण कागदपत्रे मागून आपला प्रकल्प लांबवत असल्याचा ग्रह होऊ शकतो. मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे बॅंकेतील अधिकारी सामान्यतः आवश्यक तीच कागदपत्रे मागतात. तरुण शेतकऱ्यांचा कल पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे अधिक आहे. नव्या यंत्राचा वापर करीत कृषी व कृषिपूरक व्यवसायाचा विकास करण्याची त्यांची इच्छा असते. कृषिपूरक दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीमशेती, अशा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. तसेच काढणीपश्‍चात कृषिमाल निर्यात, फळ प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया याकडेही लक्ष वेधले जात आहे. मात्र कोणताही व्यवसाय करायचा तर भांडवलाची आवश्यकता असते. कर्जरूपामध्ये भांडवल पुरविणाऱ्या बँका किंवा तत्सम वित्तीय संस्थांना योग्य त्या सर्व तांत्रिक व आर्थिक बाबींचा परामर्श घेतलेला प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प अहवाल असल्यास बॅंका अर्थ सहाय्याला प्राधान्य देतात. या प्रकल्पासोबत विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे कागदपत्रांची मागणी आणि पूर्तता यात बराच वेळ जाऊ शकतो. अनेक लोकांचे प्रकल्प यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा अधिक रखडू शकतात. त्यामुळे बँकेतील अधिकारी विनाकारण कागदपत्रे मागून आपला प्रकल्प लांबवत असल्याचा ग्रह होऊ शकतो. मात्र एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे बॅंकेतील अधिकारी सामान्यतः आवश्यक तीच कागदपत्रे मागतात. साधारणतः पुढील कागदपत्रांची तयारी आपण ठेवावी. कागदपत्रांचे वर्गीकरण 

  • केवायसी (KYC) कागदपत्रे ः बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • शेतीविषयक कागदपत्रे ः ७/१२, ८ अ, वगैरे
  • प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पाविषयीची कागदपत्रे इ.
  • अन्य कागदपत्रे ः जमिनीसंबंधीचा सर्च रिपोर्ट, गहाण खत, जमिनीचे मूल्यांकन इ.
  • कृषी प्रकल्पासोबत जोडावयाची कागदपत्रे 

  • कर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक. ज्यांच्या नावावर कर्ज प्रकरण आहे त्यांच्या नावाचे बचत खाते किंवा चालू खाते असणे गरजेचे उदा. वैयक्तिक किंवा संयुक्त नावावर असल्यास बचत खाते आणि फर्म किंवा कंपनीच्या नावावर असल्यास चालू खाते असावे लागते. फर्म व कंपनीच्या स्थापनेविषयीची सर्व कागदपत्रे.
  • अर्जदाराचे फोटो, ओळखपत्र व रहिवासी दाखला (KYC) (पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार ओळख पत्र / पारपत्र (पासपोर्ट) / वाहन चालविण्याचा परवाना यांच्या स्व साक्षांकित छायाचित्र प्रती.)
  • शेती विषयीची कागदपत्रे

  • खाते उतारा (८ अ) ,
  • खाते उताऱ्यावरील सर्व ७/१२ चे उतारे
  • चतु:सीमा :- सर्व गटाच्‍या
  • ६ ड (फेरफार) च्‍या नोंदी
  • गटाचा नकाशा /गाव नकाशा
  • सोसायटीचा दाखला (बँक इन्‍स्‍पेक्‍टरच्‍या सही सह)
  • तलाठी दाखला (सरकारी बाकी बाबत)
  • कार्य क्षेत्रातील बँकेचे दाखले (NOC) (दाखला फॉर्म बँकेकडून मिळेल)
  • कृषी प्रकल्पविषयक कागदपत्रे 

  • प्रकल्प अहवाल
  • प्रकल्पामध्ये उल्लेख असलेल्या सर्व यंत्रे, अवजारे आणि बाबींचे खरेदी, उभारणी, कामांची कोटेशन्स इ.
  • उभारणार असलेल्या इमारत किंवा शेडचे त्याचे आराखडे व अंदाजपत्रक (प्लॅन ॲण्ड इस्टिमेट)
  • इमारत /शेडसाठी आवश्यक त्या बांधकाम परवानग्या.
  • कृषिपूरक व्यवसायासंबंधी प्रशिक्षण घेतले असल्यास किंवा कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • व्‍यवसायासाठी आवश्‍यक असणारे परवाने (संबंधित खात्‍यांकडून),
  • करार पद्धतीच्या व्यवसायामध्ये कंपनीशी झालेल्या कराराबाबतचे पत्र. (ज्यात करारातील सर्व अटी नमूद केलेल्या असाव्यात.)
  • पाणी उपलब्धतेची माहिती, नोंदी उदा. विहीर, बोअर वेल, कालवे इ.
  • वीज उपलब्धतेविषयी आवश्यक कागद पत्रे. उदा. वीज मंजुरी पत्र किवा वीजबिल,
  • उत्पादनाची माहिती व विक्री करण्यासंदर्भात कागदपत्रे.
  • आयकर विवरण पत्रे (मागील तीन वर्षांची) ः (शेती व्यतिरिक्त उत्पन्न असलेल्यांसाठी)
  • अन्य कागदपत्रे व साधारण होणारा खर्च 

  • बँक कर्ज मागणी अर्ज. (बँकेतून उपलब्ध होईल.)
  • बँकेच्या अधिकृत वकिलामार्फत जमिनीचा सर्च रिपोर्ट घ्‍यावा लागतो.
  • जमिनीचे गहाणखत करावे लागते.
  • गहाणखत व बॅंकेच्‍या दस्‍तऐवजांचा खर्च करावा लागतो.
  • बांधकाम इस्टिमेट बँकेच्‍या अधिकृत आर्किटेक्‍टकडून मंजूर करून घ्‍यावे लागते.
  • जमिनीच्या कागदपत्रावर (उदा. सात बारा इ.) बँक कर्ज रकमेचा बोजा नोंद करणे आवश्यक असते.
  • करार पद्धतीत करार करणारी कंपनी, कर्जदार व बँक यांच्यात तृतीयपक्षी करार करावा लागतो.
  • आवश्यकता भासल्यास, जी जमीन तारण ठेवणार आहे, तिचे बँकेच्या अधिकृत कृषी मूल्यांकन धारकाकडून (Agriculture Land Valuer) मूल्यांकन करावे लागते.
  • पाण्यात पडलो की पोहायला येतेच! नेहमीचे काम उरकून सुभाष बँकेतून बाहेर पडला. त्याला समोरच चिंताग्रस्त दिनेश भेटला. सुभाषने दिनेशची सहज चौकशी केली, ‘‘काय रे, काय झाले?’’ सुभाष हा बँकेचा एक चांगला खातेदार समजला जातो. त्याने या बँकेतून कर्ज प्रकरण करूनच दुग्ध व्यवसाय उभा केला होता. उत्तम वाढवतही नेला होता. त्यामुळे गाव शिवारातील सर्व लोक त्याचे कौतुक करत. दिनेश हायसे वाटले. कारण संध्याकाळी त्याला भेटायला जाणार होताच. नुकताच बँक शाखाधिकाऱ्यांना भेटून आला होता. मांसल कोंबडीपालनाच्या व्यवसायासाठी त्यालाही कर्ज हवे होते. तो म्हणाला, “बँकेतच गेलो होतो. ब्रॉयलर पोल्ट्री करायचा विचार होता. बॅंक अधिकाऱ्यांशी बोललो, तर फारसे काही न बोलता त्यांनी माझ्या हाती कर्ज मागणी अर्ज दिला आणि ही मोठ्ठी कागदपत्रांची यादी दिली आहे. प्रकल्प अहवालासोबत सर्व कागदपत्रे जोडायला सांगितली आहेत. इतकी कागदपत्रे गोळा करायची, तर किती वेळ लागेल, खर्च होईल, याचीच काळजी वाटते.’’ त्याने सुभाषसमोर आपले मन मोकळे केले. सुभाषने ती यादी पाहिली आणि दिनेश समजावले. ‘‘ही सर्व कागदपत्रे कर्जासाठी आवश्यकच असतात. फार वेळही लागणार नाही.’’ तरीही दिनेशच्या चेहऱ्यावरचा ताण काही कमी झाल्याचे सुभाषला दिसले नाही. त्याला घेऊन सुभाष स्वतःच्या डेअरीवर गेला. यादीतील प्रत्येक कागदपत्र कोठे मिळतील, कशी गोळा करायची, हे त्याला सांगितले. तरीही दिनेशच्या मनात काही शंका होत्याच. तो म्हणाला , “ ७/१२, ८ अ, ६ ड वगैरे तलाठी कार्यालयातच मिळेल. काही कागदपत्रे माझ्याजवळही आहेत. पण शेडचे ‘ प्लॅन आणि इस्टिमेट’ कसे आणि कोठून घ्यावयाचे.’’ त्यावर सुभाषने त्याच्या ओळखीच्या इंजिनिअरचे नाव सांगितले. ‘‘माझ्याही डेअरी शेडचे प्लॅन आणि इस्टिमेट यांनीच तयार केले आहे. त्यांना भेट शेडची जागा, आकार आणि तुझ्या मनातील कल्पना त्यांना सांग. ते त्यानुसार अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन आणि इस्टिमेट तयार करून देतील.’’ खरेच ज्याची धास्ती घेतली होती, ते काम आठ दिवसांत पूर्ण झाले. तलाठी, ग्रामसेवक, यंत्रे, अवजारे विक्रेते, अभियंता यांच्याकडे थोड्या फेऱ्या पडल्या, पण फारसा त्रास झाला नाही. कुक्कुटपालनासाठी कंपनीबरोबरचा करारही केला. त्याची सर्व कागदपत्रे बँकेस सादर केली. सुभाष आणि गावातील कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांची मदत झाली. ‘उगीचच घाबरून गेलो होतो, एकदा पाण्यात पडलो की पोहायला येतेच’ असे दिनेशला वाटले.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

    Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

    Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

    Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

    Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

    SCROLL FOR NEXT