use of balanced application of fertilizer provides good quality crop yield 
कृषी सल्ला

विद्राव्य खतांचा योग्य वापर

मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरविणे आवश्यक असते. विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरीत्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षेतच राहतात.

ललित सिंग भंडारी, सुनील पाटील

मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरविणे आवश्यक असते. विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त  खते परिणामकारकरीत्या देणे शक्य  होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षेतच राहतात.  पीक उत्पादनामध्ये अभ्यासपूर्वक खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात जमिनीची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. यासाठी मुख्यत्वे मोकाट पाणी देण्याची पद्धत तसेच असंतुलित, अनियमित खतांचा वापर हे घटक कारणीभूत आहेत. जमिनीत मूलभूतपणे अपेक्षित असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण असंतुलित आहे. काही खतांचा अति प्रमाणात, अकार्यक्षमपणे वापर होतो. त्यातील घटक पिकाद्वारे अंशतः शोषून घेतल्यामुळे बऱ्याच अंशी न वापरले गेलेले घटक जमिनीत राहतात. त्यासोबतच मोकाट पाण्याच्या वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणात क्षार पाण्यातून जमिनीमध्ये जातात. पाणी मुळांच्या कक्षेपलीकडे गेल्यामुळे त्याभागातील अनावश्यक क्षार मुळांच्या कक्षेत येतात. जमीन, पिकांचे क्षारांमुळे होणारे नुकसान सर्व प्रकारच्या क्षारांमुळे मुळांच्या कक्षेत विपरीत रासायनिक क्रिया होऊन पिकांसाठी अनावश्यक क्षार तयार होतात. परिणामी, जमिनीची क्षारता तसेच सामू वाढतो आणि जमिनीची सुपीकता कमी होते. यामुळे पिकांद्वारे जमिनीतून अन्नद्रव्य आवश्यकतेनुसार घेतली जात नाहीत. तसेच नियोजनाप्रमाणे अन्नद्रव्य देऊनसुद्धा पिकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, उत्पादनावर परिणाम होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरविणे आवश्यक असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबत विशिष्ट रासायनिक सूत्रांद्वारे देणे क्रमप्राप्त असते, जेणेकरून ते अन्नद्रव्य पिकांद्वारे उत्तम रीतीने घेतली जाऊन पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ होते. अशा संतुलित व सूत्रबद्ध रासायनिक खतांचा वापर केल्याने खतातील अन्नद्रव्ये बऱ्याच अंशी पिकाद्वारे वापरले जातात. परिणामी, खतांची अति उच्च कार्यक्षमता प्राप्त होते.  विद्राव्य क्षमता विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरीत्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षेतच राहतात. या विद्राव्य खतांचा सर्वात जास्त फायदा पिकांना मिळतो.  विद्राव्य खतांमधील घटक 

  • विद्राव्य खते मुख्यत्वे युरोपियन मानकांद्वारे बनविली जातात. यामध्ये उत्तम प्रतीचे कच्चे घटक वापरून शुद्ध स्फटिकरूपी खते तयार होतात. 
  • या खतामध्ये क्लोरिन, सोडिअम, इत्यादी जड धातू  इतर अशुद्ध घटकांचे प्रमाण नगण्य असते. यामुळे आवश्यक असलेल्या नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या प्राथमिक; कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर या दुय्यम तसेच लोह, मँगेनीज, झिंक, कॉपर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जास्तीत जास्त उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता सर्वोत्तम असते.
  • फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर

  • पिकांना जमिनीतून पोषकद्रव्यांचा पुरवठा करण्याबरोबरच पर्णरंध्रांद्वारे पिकांचे पोषण ही एक पूरक व प्रभावी पद्धत आहे. 
  • जेव्हा ठरावीक परिस्थितीमुळे पिकांना अन्नद्रव्य देणे मर्यादित असते, तेव्हा पर्णरंध्रांद्वारे पिकांना अन्नद्रव्ये देणे फायदेशीर ठरते. 
  • वातावरणातील बदलाच्या परिस्थितीमध्ये जमिनीचा उच्च सामू, तापमानामुळे तणाव, खूप कमी किंवा खूप जास्त मातीचा ओलावा, मुळांद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि मातीमध्ये पोषकद्रव्यांचे असंतुलन अशा गोष्टी जाणवतात, तेव्हा पिकांना जमिनीतून आवश्यक तेवढी अन्नद्रव्ये घेणे शक्य होत नाही. अशावेळी पानांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा उपयुक्त ठरतो. यामुळे अन्नद्रव्यांची पिकांना त्वरित उपलब्धता होते. 
  • फायदे

  • जमिनीतून आणि पर्णरंध्रांद्वारे पिकांना केला जाणारा अन्नपुरवठा या दोन्ही पद्धतीची तुलना केली असता, पर्णरंध्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ८ ते १० पट जास्त असते.
  • अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित ती कमतरता पानांद्वारे पोषण देऊन भरून काढता येते.  
  • वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पिकांना वेगवेगळ्या प्रमाणात पोषकद्रव्ये आवश्यक असतात. ज्या वेळी पोषण संतुलित ठेवणे कठीण असते तेव्हा पीक वाढीच्या मुख्य टप्प्यात फवारणीद्वारे पिकांना अन्नद्रव्ये देऊन पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यात मदत होते.
  • फवारणीद्वारे दिल्या  जाणाऱ्या खतांचे गुणधर्म 

  • फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचे गुणधर्म हे जमिनीतून देण्यात येणाऱ्या खतांच्या गुणधर्मापेक्षा बऱ्याच अंशी वेगळे असतात. मुळे आणि पाणी या दोन घटकांची संरचना आणि  कार्यप्रणालीमुळे हे गुणधर्म वेगळे असतात.
  • पिकांना फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचा सामू पाचपेक्षा कमी नसावा. काही वेळा अशी खते पिकांच्या पानांना इजा पोहोचवू शकतात. पानांचा वरील पृष्ठभाग आम्लाने भाजला जाऊन पाने कोमेजतात.
  •  फवारणीद्वारे देण्यात येणारी खते अशा पद्धतीची असावीत, की ती पाण्यात विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या फवाऱ्यातील पाण्याच्या बिंदूचा आकार धुक्यासारखा असावा. ही खते पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळून संतृप्त द्रावण बनविणारी असावीत.
  •  विशिष्ट घटकांमुळे फवारणीत खतांच्या द्रावणाचे सूक्ष्म थेंबांमध्ये पृथक्करण मोठ्या प्रमाणावर होऊन ते द्रव्य पानाच्या पृष्ठभागावर उत्तम पद्धतीने पसरून पर्णरंध्राद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात शोषले जाते. ते त्वरित प्रकाशसंश्‍लेषणासाठी वापरात येऊन त्याची कार्यक्षमता वाढलेली असते. 
  •  विद्राव्य खतांची परिणामकता अधिक असते. त्यांची शिफारशीत मात्रेमध्ये फवारणी केल्यास चांगले पीक उत्पादन मिळते.  
  • योग्य खतांची निवड राज्यातील बहुतांशी जमिनीचा सामू वाढत आहे आणि पीक उत्पादकता खालावलेली आहे. यावरील उपाय म्हणजे पिकांच्या शरीरक्रियाशास्रानुसार वैशिष्ट्यपूर्ण खतांची निवड. अशा वैशिष्ट्यपूर्ण खतामध्ये विशेष गुणधर्म असणे अपेक्षित आहे. सामू (पीएच) 

  • आपल्याकडील जमिनीची क्षारता जास्त असल्यामुळे आम्लीय गुणधर्म असणाऱ्या खतांचा वापर योग्य ठरतो. 
  • प्रत्येक पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकांच्या मुळांद्वारे जमिनीतून खते घेण्याच्या क्षमतेनुसार खतांचा योग्य सामू असणे आवश्यक आहे. असा योग्य सामू क्षारता कमी करून पिकाला अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त पुरवठा करतो. जमिनीत जास्त प्रमाणात साका सोडत नाहीत. तसेच कमी सामूची खते वापरल्याने ठिबक सिंचन बंद होण्याचे प्रमाण कमी होते. 
  • - सुनील पाटील,  ९८२२५९८६९८ - ललित सिंग भंडारी,  ७०२३४१४३७० (ललित सिंग भंडारी हे फिनोझेन न्यूट्रीगेशन येथे जनरल मॅनेजर आणि सुनील पाटील हे फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज  प्रा.लि.चे उपाध्यक्ष आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

    Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

    Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

    Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

    Agrowon Podcast: सोयाबीनवरील दबाव कायम; मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर

    SCROLL FOR NEXT