Spraying of soluble fertilizer is beneficial during the crop growth stage 
कृषी सल्ला

उन्हाळी नाचणीचे दाणे भरण्याच्या अवस्थेतील व्यवस्थापन

पिकाला योग्य प्रमाणात पाणी द्यावे. काही कारणाने पाण्याची पाळी लांबणार असेल तर फवारणी पंपाने पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी घेतल्यास पीक तग धरण्यास सक्षम बनते. शेतीचे बांध सध्याच्या काळात स्वच्छ ठेवावेत.

पराग परीट

 पिकाला  योग्य प्रमाणात पाणी द्यावे. काही कारणाने पाण्याची पाळी लांबणार असेल तर फवारणी पंपाने पिकावर दोन टक्के युरियाची  फवारणी घेतल्यास पीक तग धरण्यास सक्षम बनते. शेतीचे बांध सध्याच्या काळात स्वच्छ ठेवावेत.   सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत बियाणे पेरून त्यापासून तयार झालेली नाचणीची रोपे एकवीस ते पंचवीस दिवसांची झाल्यावर म्हणजेच जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत मुख्य शेतात लावली गेली असतील, तर आता नाचणी पीक पोटरी अवस्थेत असेल. अनुकूल वातावरण मिळाले असल्यास कणसे बाहेर पडलेल्या अवस्थेत असेल. अशा वेळी पिकाला संरक्षित पाणी देणे आवश्यक आहे.  पिकाला  योग्य प्रमाणात पाणी द्यावे. काही कारणाने पाण्याची पाळी लांबणार असेल तर फवारणी पंपाने पिकावर दोन टक्के युरियाची  फवारणी घेतल्यास पीक तग धरण्यास सक्षम बनते. शेतीचे बांध सध्याच्या काळात स्वच्छ ठेवावेत.  

  • नाचणीच्या कणसाची फुले मिटून दाणे भरण्याची अवस्था सुरु झाली की पाच ग्रॅम पोटॅश प्रती लिटर पाण्यात मिसळून  सकाळी फवारणी करावी. यामुळे पिकाचा काटकपणा वाढतो. दाण्यांचा आकार आणि रंग यात सुधारणा होते.
  • ज्या भागात नाचणी पोटरी अवस्थेत आहे तेथील शेतकऱ्यांनी पाच ग्रॅम ०:५२:३४  प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे कणसाचा आकार, पाकळ्यांचा आकार सुधारतो. पीक पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम बनते.
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकावर पाच ग्रॅम ०:०:५० प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकाची पक्वता लवकर येते. पिकाची गुणवत्ता सुधारते.
  • (टीप : लेखात दिलेली माहिती गेल्या दोन वर्षांपासून पन्हाळा तालुक्यात राबवत असलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादनविषयक प्रयोगांमधील निरीक्षणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आलेल्या अनुभवांवरून संकलित केली आहे.)
  •  - पराग परीट,  ९९२११९०६७१ (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, गगनबावडा, जि.कोल्हापूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT