Uddhav Thackeray on farm loan waiver: शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारच्या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पुढच्या जूनचा वायदा केला. पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यत डोक्यावर जो कर्जाचा डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही? असा सवाल ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. ते सोमवारी (दि. ३) मातोश्री येथे पत्रकार परिषदेत बोलत होते..कर्जमाफीसाठी ३० जून हा कोणता मुहूर्त आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणते पंचांग पाहिले. जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तर आतापासून कर्जाचे हप्ते फेडले नाहीत त्याच्यासकट त्यांना माफ केले पाहिजे. त्यावर सरकारने बोलले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. .Farm Loan Waiver : शेती कर्जमाफीची अनिवार्यता!.आताच्या रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज कसे मिळणार? कारण जमिनीच वाहून गेली आहे. मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे हप्ते भरायचे की नाहीत? हा सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की बँकेचा फायदा होईल म्हणून आम्ही आता कर्जमाफी करत नाही. जूनमध्ये केली तरी होणार नाही. हे कोणते गणित आहे? याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, असे ठाकरेंनी म्हटले आहे. .Farm Loan Waiver: तीन तास वादळी चर्चा, सरकारकडून रेटारेटी अन् निर्णय...; नेमकी किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी? .मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कोणताही अभ्यास अथवा मागणी नसताना, मी शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. जी योजना आम्ही यशस्वीपणे अमलात आणून दाखवली होती. ती संपर्क यंत्रणा, डेटा तसाच आहे. तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आता जाहीर का करु नये, असेही त्यांनी सूचित केले आहे. .सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे; त्यांना माती मिळाली पाहिजे. माती मिळत नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार, असा सवालही त्यांनी केला..शेतकऱ्याला कर्जमुक्त करावेच लागेल. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यांचे आयुष्य पुर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या सोबत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मराठवाड्यात जात आहे. मी ५ तारखेपासून मराठवाड्यात चार दिवस जातोय. विदर्भातही जाईन. शेतकऱ्यांसाठी सरकारने जे पॅकजे जाहीर केले होते; त्यातील किती पैसे त्यांना आलेत. याबाबत मी शेतकऱ्यांशी बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. .राज्य सरकाकडून केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही?आज किंवा उद्या केंद्राचे पाहणी पथक राज्यात येणार आहे. माझ्या माहितीनुसार, त्यांचा दोन- तीन दिवसांचा दौरा आहे. एवढ्या कमी दिवसांत ते नेमके कुठे जाणार? नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार?. मुळात पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना बोलले होते की तुम्ही प्रस्ताव पाठवा. मला वाटत नाही राज्य सरकाकडून केंद्राकडे गेला असेल, असे त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.