गादीवाफ्यावर आणि पिशवामध्ये रोपनिर्मिती  
कृषी सल्ला

अशी करा ड्रॅगन फ्रूट रोपनिर्मिती...

ड्रॅगन फ्रूटची रोपे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार होतात. योग्य लांबीच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन उत्तम गुणवत्तेची रोपे मिळतात.

विजयसिंह काकडे, डॉ. डी. डी. नागरे  

ड्रॅगन फ्रूटची रोपे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार होतात. योग्य लांबीच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन उत्तम गुणवत्तेची रोपे मिळतात.  सद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध प्रकार हे सर्व बाहेरील देशांमधून आलेले आहेत. भारतामध्ये, पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल आणि  पांढरा गर व पिवळी साल इत्यादी प्रकार लागवडीस उपयुक्त आहेत.  विविध कृषी संशोधन संस्थांमार्फत फळांच्या जातींबाबत संशोधन चालू आहे. सध्यातरी, या फळपिकाच्या नोंदणीकृत तसेच स्थानिक जाती उपलब्ध नाहीत. रोपनिर्मिती

  • ड्रॅगन फ्रूटची झाडे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार केली जातात.  
  • एक वर्ष जुनी गडद हिरव्या रंगाची फांदी निवडावी. हलक्या हिरव्या रंगाच्या फांद्यांना फुटवे थोडेसे उशिरा लागतात. 
  • २० ते २५ सेंमी लांब आणि ५ ते ६ सेंमी जाडीची फांदी रोपे तयार करण्यासाठी निवडावी. यापेक्षा लहान फांद्या सुद्धा वापरल्या जाऊ शकतात परंतु जर रोपवाटिकेमध्ये खोड कूज रोगाचा प्रादुर्भाव झाला तर, लहान फांद्या पूर्णपणे काढून फेकून द्याव्या लागतात. 
  • योग्य लांबीच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन उत्तम गुणवत्तेची रोपे मिळतात. 
  • फांदीवर कोणत्याही प्रकारच्या रोगाची लक्षणे नसावीत, जेणे करून नवीन बागेमध्ये रोगांचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी घेता येते. 
  • निवडलेल्या फांद्या ४ ते ५ दिवसांकरिता सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्याने कॅलसिंग व्यवस्थित होऊन रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. 
  • रोपवाटिकेत फांदी लावण्यापूर्वी बुरशीनाशक (कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणात बुडवावी. 
  • रोपवाटिकेमध्ये पॉलिथिनच्या पिशवीमध्ये (१०x२५ सेंमी आकार) खत, माती मिश्रण भरून त्यामध्ये फांदी लावावी.
  • गादी वाफा तयार करून त्यावर फांद्यांचे रोपण करून रोपनिर्मिती करता येते. रोपे बनवण्यासाठी  ३ फूट रुंद आणि ०.५-१ फूट उंच  गादी वाफा तयार करावा. यामध्ये शेणखत मिसळावे. ठिबक सिंचनाची लॅटरल टाकावी. गादी वाफ्यावर १५ ते २० सेंमीच्या अंतरावर फांद्या (कटिंग) लावाव्यात. नियमित अंतराने पाणी देत राहावे. गादी वाफ्यावर फांद्या लावल्याने मेहनत कमी होते त्याबरोबर खर्च ही वाचतो. अशाप्रकारे, तयार रोपांचे १.५ ते २ महिन्यानंतर मुख्य जागी पुनर्रोपण करता येते. 
  • रोपे तयार करण्याची जागा निवडताना जमिनीवर पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जिथे थोडीफार सावली असेल (२० ते ३० टक्के ) अशी जागा निवडली तर फायदेशीर ठरते. लावलेल्या फांद्यांना १५ ते २० दिवसामध्ये मुळे येतात आणि २० ते ३० दिवसांपासून फुटवे निघायला सुरवात होते. 
  •  - विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे )

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    M.S. Swaminathan Award: डॉ. चेरुकुमल्ली श्रीनिवासराव यांना स्वामिनाथन पुरस्कार जाहीर

    Water Crisis Planning: कमी पाऊस : चिंता की चिंतन

    Land Records Portal Issue: नूतनीकरणाच्या नावाखाली सात-बारा वितरण ठप्प

    Indian Constitution: घटनात्मक पायाभरणीमुळे लोकशाही सशक्त: राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    Agriculture Committee Extension: मुदतीनंतरही पुन्हा मुदतवाढ

    SCROLL FOR NEXT