फूलशेती सल्ला 
कृषी सल्ला

फुलशेती सल्ला

डॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे

सद्य स्थितीमध्ये फुलपिकांमध्ये घ्यावयाची काळजी व कार्यवाही यांची माहिती घेऊ.

गुलाब

  • खुल्या शेतातील गुलाब पिकाची छाटणी करावी. छाटणी करताना जुन्या, कीड व रोगग्रस्त, एकमेकांत गुंतलेल्या, आडव्या- तिडव्या किंवा वाकड्या, तसेच वाळलेल्या फांद्या धारदार सिकेटरच्या सहाय्याने कापून टाकाव्यात. झाडाला योग्य आकार मिळेल अशी छाटणी करावी. त्यासाठी लांब धुमारे अर्धेअधिक कापावेत.
  • झाडाला आकार देताना पिकातील आंतरमशागतीची कामे सुलभ होईल, अशापद्धतीने छाटणी करावी. छाटलेल्या भागावर ताबडतोब १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो चूना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.
  • छाटणीनंतर हेक्‍टरी १५ टन शेणखत व ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. खते देताना आळे किंवा चर पद्धतीने द्यावीत. खत दिल्यानंतर पाणी द्यावे.
  • ॲस्टर

  • ॲस्टर पिकाच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर ॲस्टरची रोपे तयार करावीत. रोपे तयार करण्यासाठी १x१ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्याची उंची १५-२० सें.मी. ठेवावी. बियांची पेरणी वाफ्यावर ओळीत करावी. शक्‍यतो जमिनीत १-१.५ सें.मी. खोल बी पेरावे. दोन ओळीतील अंतर १०-१५ सें.मी ठेवून वाफ्यावर बी पातळ पेरावे.
  • लागवडीसाठी १५-२० सें.मी. उंच वाढलेली अथवा ५-७ पाने असलेली रोपे निवडावीत. लागवडीपूर्वी रोपांची कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर (०.१ टक्के) पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.
  • लागवड सरी वरंब्यावर ३०x३० सें.मी. अथवा ३०x४५ सें.मी. अंतरावर करावी.
  • ग्लॅडिओलस

  • ग्लॅडिओलसची लागवड उशिरात उशिरा १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाची झाल्यास टप्प्याटप्प्याने १०-१५ दिवस अंतर ठेवत करावी.
  • लागवडीसाठी निरोगी, मोठे कंद निवडावेत. लागवड करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन कंदातील अंतर १०-१५ सें. मी. ठेवावे.
  • लागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे तयार केलेल्या द्रावणात १० मिनिटे बुडवून घ्यावेत. त्यामुळे पिकाचे मर रोगापासून संरक्षण होते.
  •  संपर्क: डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेशखिंड - पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

    Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

    Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

    Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

    Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

    SCROLL FOR NEXT