वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू लागली आहे. 
कृषी प्रक्रिया

बेकरी व्यवसायातील विविध उत्पादने

राजेंद्र वारे

इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय उत्तम रीतीने करता येतो. बेकरी व्यवसायातील विविध उत्पादने व त्यासाठी लागणाऱ्या यंत्रांविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ...   आज बेकरी व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे. सध्या बेकरीतील विविध उत्पादने मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यामुळे या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी ठरावीक प्रसंगी म्हणजेच फक्त वाढदिवसालाच बेकरीतील केक खाल्ला जायचा. आता मात्र कोणत्याही प्रसंगी केक अथवा इतर बेकरी उत्पादने सर्रास खाल्ली जातात. सध्या वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू लागली आहे.   विविध बेकरी उत्पादने अ) ड्राय बेकरी उत्पादने १) खारी खारीमध्ये चीज, जीरा आणि मेथी असे प्रकार बनवता येतात. २) टोस्ट मिल्क, टूटी फ्रुटी, इलायची आणि मसाला असे टोस्टचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. ३) बटर बटरमध्ये मसाला, जीरा आणि ओवायुक्त असे विविध स्वादाचे बटर मिळतात. ४) क्रीमरोल  चॉकलेट, पाईन ॲप्पल, मँगो, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी असे क्रीमरोलचे विविध प्रकार आहेत. ५) कुकीज ः कुकीजमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत यामध्ये पिस्ता, चोको चिप्स, चॉकलेट, ड्राय फ्रुट, स्विस बेरी, पीनट बटर, जिंजर, ओट्स आणि काजू विशेष लोकप्रिय आहेत. ब) वेट बेकरी उत्पादने १) ब्रेड होल व्हीट (गव्हापासून बनवलेला), मैदा, गार्लिक, मिल्क, सॅंडविच, फॅमिली, डोनटस् , ब्रेड स्टिक्स असे ब्रेडचे विविध प्रकार आहेत. २) पाव पावापासून बनविलेल्या विविध पदार्थांप्रमाणे पाव बनविले जातात यामध्ये बन पाव, कच्ची दाबेली पाव, बर्गर बन पाव, पिझ्झा बेस पाव इ. प्रकार आहेत. केकचे प्रकार केके सर्वांनाच प्रिय असतो. सध्या केकचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी ब्लॅक फॉरेस्ट, पाईन ॲप्पल, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मावा, रस मलाई, रेड वेलवेट, ब्लू बेरी, ब्लू बेरी, चोको चिप्स, ग्रीन ॲपल, मुस केक, बटर, फोटो केक, डेझर्ट, आईस क्रीम केक विशेष लोकप्रिय आहेत.   बेकरी व्यवसायातील विविध यंत्रे ः

  • वजन काटा
  • शिफ्टर/सिव्हर (चाळण्यासाठी उपयुक्त)
  • डफ मिक्सर ः मिसळण्यासाठी उपयुक्त
  • शिटर/शिटिंग मशिन (पोळी पातळ लाटण्यासाठी उपयुक्त)
  • बन डिव्हायडर
  • कटर
  • मोल्ड (साचा)
  • बेकिंग ओव्हन
  • प्रुफर (ब्रेड फुगविण्यासाठी )
  • ब्रेड स्लाईसर (ब्रेडचे काप करण्यासाठी)
  • हॅन्ड सिलर
  • प्लॅनेटरी मिक्सर
  • डीप फ्रीझ
  • शीतगृह
  • या सर्व यंत्रांच्या खरेदीसाठी साधारणपणे १५ ते १८ लाख रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.    

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

    Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

    khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

    Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

    Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

    SCROLL FOR NEXT