भात कोंड्यापासून तेल निर्मिती  
कृषी प्रक्रिया

प्रक्रियेसाठी भाताचा कोंडा

डॉ. अमोल खापरे

भात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप नैसर्गिकरीत्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करते. यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच प्रतिजैविके असतात.

  • कोंडा हा तांदळावरील बाह्य पातळ थर असतो. त्यामध्ये संयुक्त ऑलिओरॉन आणि पेरीकर्प थर असतात. कोंडा हा एकूण तांदळाच्या दहा टक्के प्रमाणात असतो. कोंडा हे तांदूळ गिरणीतील उप-उत्पादन आहे. तांदूळ कोंडा हे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, तंतुमय पदार्थ, प्रतिजैविके, कर्बोदके आणि इतर पोषक घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहे. विशेषतः कोंड्यामध्ये टॉकोफेरोल, जी-ऑरिझॅनॉल, स्टेरोल आणि कॅरोटीनोड्सचे प्रमाण असते.
  •  कोंड्यामध्ये जीवनसत्त्व ई, बी-कॉम्प्लेक्स, जी-ऑरिझॅनॉल आणि फायटोस्टेरॉल यांचा समावेश होतो. यामध्ये सर्व आवश्यक अमीनो ॲसिड आहे. कोंड्यामधील ऑरिझॅनॉल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते.
  •  संशोधनाच्या निष्कर्षानुसार यातील 'टोकोट्रियनोल्स' पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबू शकतो, तसेच हे एचबीए १ सी आणि रक्तातील लिपिडचे (चरबी) प्रमाण कमी करू शकते. मधुमेह (प्रकार-२) हे आजारावर फायदेशीर आहे.
  • कोंडामधील फायटोस्टेरॉल हे शरीरातील विविध हार्मोनची पातळी सुधारण्यास मदत करतात. यामधील उच्च प्रमाणातील तंतुमय पदार्थ आपल्या पचनासाठी चांगले असते.
  •  कोंड्यामध्ये २३ टक्के तेल असते. जे स्वयंपाकासाठी उत्तम असते.
  • प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांमध्ये वापर     बेकरी, नूडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करताना त्यातील प्रमुख धान्यपिठात (गहू किंवा तांदूळ पीठ) १० ते २० टक्के तांदूळ कोंडा पीठ मिसळून पदार्थांचे पोषणमूल्य वाढविता येते.

    त्वचा उपचार     नैसर्गिक सौंदर्य उपचार म्हणून कोंडा तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यातील ऑलिक ॲसिडचे उच्च प्रमाण हे मानवी त्वचेमध्ये शोषले जाते. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि जी-ऑरिजॅनॉलसह अँटिऑक्सिडंट्स समाविष्ट आहे, जे रंगद्रव्य विकासावर प्रभाव पाडतात.

    बायोडिझेल उत्पादन भात कोंडा तेल हे बायोडिझेल निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाते.

    पशुखाद्य      गायी, म्हशी, शेळ्या, वराहांसाठी तांदूळ कोंडा हे खाद्य म्हणून वापरले जाते.

    भात कोंडा हे सुपर फूड भात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप नैसर्गिकरीत्या आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्य करते. तांदूळ कोंडा हा सुपर फूड आहे. यामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच प्रतिजैविके असतात. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा होतो. विविध प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात भाताचा कोंडा मिसळून, आपल्या आहारामध्ये जास्त कॅलरीज न जोडता आपण अन्नपदार्थांचे पोषण सहजरीत्या वाढवू शकतो.

    तेल उद्योगांतील वापर

  •  कोंड्यापासून तयार केलेले मूल्यवर्धित खाद्यतेल कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण कमी करणारे असून नैसर्गिकरीत्या ऑरिझॅनॉलने समृद्ध आहे.
  •   कोंड्यामध्ये १८ ते २३ टक्के तेल असते, जे पॉलिअनसॅच्युरेट्स आणि मोनोअनसॅच्युरेट्समध्ये स्निग्ध आम्लांनी उच्च असते. उच्च तापमानांमध्ये यातील पोषक गुणधर्म स्थिर असतात.
  •  तेलामध्ये अनेक आरोग्यपूर्ण गुणधर्म आहेत. त्यातील टोकोफेरोल, टोकोटीरिनॉल आणि जी-ऑरिजनॉल हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
  • - डॉ. अमोल खापरे, ०८०५५२२६४६४

    (अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

    Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

    Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

    Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

    Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

    SCROLL FOR NEXT