आंध्र प्रदेशातील रयतु भरोसा केंद्राला संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) सेंटर फॉर चॅम्पियन्स ॲवॉर्डसाठी नामांकन जाहीर झाले आहे. सरकारी पातळीवरून खाद्य सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पेरण्यांपूर्वी खते, रसायने, बी-बियाणे इत्यादींची तयारी करावी लागते. त्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊन या सगळ्यांची खरेदी करावी लागते. तसे आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांना ही धावाधाव करण्याची गरज नसते. कारण त्यांच्या रयतु भरोसा केंद्रामार्फत या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात.
रयतु भरोसा केंद्र या संकल्पनेने आंध्र प्रदेशातील शेतीचे चित्र पालटून टाकले आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरविण्यापासून ते त्यांच्या कृषिमालाची हमीभावाने (MSP) खरेदी करण्यापर्यंतची कामे रयतु भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येतात.
शेतकऱ्यांच्या खते, बी-बियाणे, कीडनाशके, शेतीमालासाठी बाजारपेठ अशा अनेक गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारी आंध्र प्रदेशातील रयतु भरोसा केंद्र ही त्या राज्याच्या कृषी विभागाची आगळीवेगळी ओळख बनली आहेत. ही रयतु भरोसा केंद्रे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्राबद्दलही मार्गदर्शन करतात.
शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदीपासून ते त्यांच्या पिकांना रास्त दर मिळवून देण्यासाठी माहिती देणे, पिकांबाबत मार्गदर्शक करण्याचे कामही रयतु भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याचे काम या केंद्रांकडून करण्यात येत आहे.
आजमितीस आंध्र प्रदेशात १०,७७८ रयतु भरोसा केंद्रे शेती आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता करत आहेत. या रयतु भरोसा केंद्रांची स्वतःची एटीएमही आहेत. रयतु भरोसा केंद्रांच्या १३ एटीएमना उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचे आयएसओ (ISO) प्रमाणपत्रही मिळालेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.